ETV Bharat / politics

"लोकसभा लढवण्यासाठी मी इच्छुक नाही, पण..."; सुधीर मुनगंटीवारांनी केलं स्पष्ट

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 4, 2024, 10:10 PM IST

Sudhir Mungantiwar News
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar : 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे वेध आता सर्वांना लागले आहेत. चंद्रपूर लोकसभा (Chandrapur Lok Sabha) क्षेत्रातून भाजपा पक्षाकडून माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची नावे चर्चेत होती. मात्र, यावर सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टीकरण दिलंय.

प्रतिक्रिया देताना सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर Sudhir Mungantiwar : चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत (Chandrapur Lok Sabha) भाजपाकडून सुधीर मुनगंटीवार हे लढणार अशी जोरदार चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. या चर्चावर मुनगंटीवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. "मी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नाही, त्या दृष्टीने मी तयारी देखील केलेली नाही. मात्र जर पक्षाने आदेश दिला तर एक कार्यकर्ता म्हणून मी निश्चित लोकसभा लढवेन" असं मत मुनगंटीवारांनी व्यक्त केलं.


लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक नाही : चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं 'मीट द प्रेस' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत मुक्त संवाद साधला. यावेळी आपण लोकसभा निवडणूक लढणार का? या प्रश्नावर त्यांनी प्रतिक्रिया दिलीय. आपण लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक नाही. तशी तयारी देखील आपण केली नाही. निवडणूक न लढविण्याचं कारण म्हणजे गेल्या 30 वर्षांपासून आपण राज्याच्या राजकारणात सक्रिय आहे. या माध्यमातून येथील राजकीय नेत्यांशी परिचय, अधिकाऱ्यांशी ओळख आणि येथील राजकारण यात आपण रमलो आहे. या माध्यमातून आपल्या लोकांसाठी प्रभावीपणे काम करता येणं शक्य होते. म्हणून आपण त्या दृष्टीने कधी लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला नाही. त्यादृष्टीनं आपण विचार केला नाही. तसं असतं तर आधीच पूर्वतयारी केली असती. मात्र जर पक्षानं सांगितलं, पक्षादेश झाला तर मात्र मी लोकसभा निवडणूक निश्चित लढेन, असंही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलंय.

2024 चा भाजपाचा उमेदवार कोण : चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून भाजपा पक्षाकडून माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची नावे चर्चेत होती. मात्र, एक मार्च रोजी भाजपाने लोकसभा निवडणूक निरीक्षकांची यादी जाहीर केली आणि या चर्चेला आता विराम लागला होता. यात मुनगंटीवार आणि हंसराज अहिर या दोघांची नावे असल्यानं आता 2024 चा भाजपचा उमेदवार कोण यावर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.


हेही वाचा -

  1. वाघनखे भारतात आणण्यास होत आहे उशीर; विरोधकांचा हल्लाबोल तर सत्ताधाऱ्यांचे सडेतोड उत्तर
  2. नाटकांचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी प्रत्येक तालुक्यात नाट्यगृह उभारणार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवारांची घोषणा
  3. काँग्रेसला 'पॉलिटिकल अल्झायमर' आजार झाला ; सुधीर मुनगंटीवार यांचा हल्लाबोल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.