ETV Bharat / politics

लोकसभा निवडणुकीचा प्रचार विकासावरून जाती-धर्मावर घसरला - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 11, 2024, 9:54 PM IST

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले आहेत, अजून चार टप्पे पार पडणार आहेत. मात्र, पहिल्या दोन टप्प्यानंतर प्रचारातील मुद्दे विकासावरून जाती धर्म (Cast Religion) आणि पाकिस्तान पर्यंत जाऊन पोहोचले आहेत. यासंदर्भात नेमकं राजकीय पक्षांची भूमिका काय आहे? हे जाणून घेऊया.

Lok Sabha Election 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह (Mumbai Reporter)

प्रतिक्रिया देताना अँड. धनंजय शिंदे आणि केशव उपाध्ये (Mumbai Reporter)

मुंबई Lok Sabha Election 2024 : देशातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले आहेत, चौथ्या टप्प्याचा प्रचारही थांबला आहे. आता उरलेल्या तीन टप्प्यांसाठी देशभरात सर्वत्र जोरदार प्रचार सुरू आहे. देशात एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी असा संघर्ष सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), अमित शाह, राजनाथ सिंग, नितीन गडकरी या एनडीएच्या स्टार प्रचारकांनी देशभरात प्रचाराचं रान उठवलं आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून इंडिया आघाडीकडून राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, उद्धव ठाकरे असे अनेक दिग्गज नेते देशात आणि राज्यात प्रचार करीत आहेत.



प्रचाराचे मुद्दे बदलले : पहिल्या दोन टप्प्यातील प्रचारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशातील गरिबांसाठी घरे, रस्ते, मूलभूत सुविधा, रोजगार याबाबत मांडणी केली जात होती. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसकडून महिलांचे उत्पन्न, आरक्षण, जातनिहाय जनगणना, आरोग्य आणि रोजगार या विषयांचा समावेश प्रचारातील मुद्द्यांमध्ये सातत्याने होताना दिसत होता. मात्र, पहिल्या दोन टप्प्यानंतर जनतेत असलेला प्रवाह आणि रोष पाहता निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे हळूहळू बदलत गेले. 'या निवडणुकीत पुन्हा एकदा मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी धार्मिकतेचा आधार घेतला जाऊ लागला आहे'. राम मंदिर आणि धार्मिक प्रचारासोबतच, आता भारतात निवडणूक जिंकल्या तर पाकिस्तानात फटाके फुटले जातील. पाकिस्तान मधल्या लोकांना काँग्रेसनं विजयी व्हावं असं वाटतं आहे अशा पद्धतीचा प्रचार सुरू करण्यात आलाय.



पराभव दिसू लागल्यानं जाती-धर्माचा प्रचार : यासंदर्भात बोलताना आपचे राज्य उपाध्यक्ष अँड. धनंजय शिंदे म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीचे तीन टप्पे संपले आहेत. या तीन टप्प्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षांमध्ये कोणत्या गोष्टी केल्या, काय विकास केला, याविषयी न सांगता आम्ही पुढे काय करणार आहोत याच्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न केलाय. परंतु लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावरचा विश्वास हा पूर्णपणे उडालेला आहे. तीन टप्प्यांमधील ज्या पद्धतीनं मतदान झालं आहे, ज्या पद्धतीनं लोकांचा प्रतिसाद मिळतोय, जे काही भाजपाने अंतर्गत सर्व्हे केला आहे, त्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली की, भारतीय मोठ्या पराभवांना सामोरे जावं लागणार आहे. आता उरलेल्या चार टप्प्यांमध्ये अशीच परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून भारतीय जनता पक्ष आता त्यांची रणनिती बदलत आहे.

जनतेने निवडणूक घेतली हातात : दुसरीकडं जनता ज्या पद्धतीने इंडिया आघाडीसोबत उभी राहतेय, यामुळं ही निवडणूक भारतातील जनता विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशी स्पष्टपणे झालेली आहे. जनतेनेच निवडणूक हातात घेतली तर भारतीय जनता पक्षाचं काही खरं नाही अशी चर्चा सुरू झाल्यामुळं, भारतीय जनता पक्षाचे जे हुकमी पत्ते आहेत. ज्यांचा ते लोकशाही संकेत सर्वपणे बाजूला ठेवून त्याचा जे वापर करतात आणि त्याच्याआधारे धर्म, पाकिस्तान, हिंदू मुस्लिम राजकारण करून सत्तेवर निवडून येण्यात त्यांना काही प्रमाणात यश मिळालंय. तो प्रयोग पुन्हा करून पाकिस्तान या गोष्टींवरती प्रचाराला सुरुवात केलीय. भारतीय जनता पक्षाच्या सर्वच नेत्यांनी गेल्या दहा वर्षात करण्यासारखं काहीच नव्हतं आणि म्हणून पुन्हा एकदा या त्याच्या मुद्द्यांवरती निवडणूक प्रचार सुरू केलाय असं म्हणता येऊ शकेल आहे. धर्माच्या सहाय्यानं निवडणूक लढवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही शिंदे यांनी यावेळी केलाय.


भाजपाचा प्रचार केवळ विकासाच्या मुद्द्यावर : यासंदर्भात बोलताना भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी याचा इन्कार केलाय. ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचा प्रचाराचा मुद्दा बघितला तर आम्ही सातत्यानं विकासाच्या मुद्दे मांडतोय, दहा वर्षात ज्या पद्धतीचं काम पंतप्रधान मोदी यांनी केलं, तेच जनतेपुढे घेऊन जातोय, मात्र विरोधकांकडं ना मुद्दा आहे, ना दिशा आहे, ना एकी आहे. त्यांना काय लोकांसमोर जाऊन बोलू हेच कळत नाही. त्यामुळं एका अर्थाने पंतप्रधान मोदीं यांच्याबद्दल अत्यंत वाईट भाषा वापरली जाते आहे. अन्य काही जे प्रचारात चांगले नाहीत असे मुद्दे आणणं, जातीवादावरती जाणे, अशा प्रकारचं काम विरोधकांकडून सातत्याने होते. विरोधी पक्षाचे नेत्यांकडून अत्यंत खालच्या भाषेत बोलणं, पंतप्रधानांवर खालच्या स्तरावर टीका करणं, हे सुरू आहे जे जनता स्वीकारणार नाही. मुळामध्ये पाकिस्तान संदर्भातील विधान मणीशंकर अय्यर यांनी केलं आहे, अशा पद्धतीची विधाने आम्ही केली नाहीत. ही विधाने काँग्रेसकडूनच सुरू झाली आहेत. दक्षिणेतील लोक आफ्रिकन सारखी दिसतात असं म्हणणारे सॅम पित्रोदा असतील, मणीशंकर अय्यर पाकिस्तान बद्दल काय बोलले हे सर्वांना माहीत आहेच. भारतीय जनता पार्टीचा प्रचाराचा मुद्दा अतिशय क्लियर आणि फोकस आहे. मात्र, त्याला उत्तर देता येत नसल्यामुळं हे लोक अशा पद्धतीची विधान करत आहेत असंही उपाध्ये यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. पालघर बंदराला विरोध करणाऱ्यांना युवा एल्गार आघाडी समर्थन देणार, लोकसभा निवडणूकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय - Lok Sabha election 2024
  2. नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींच्या सभास्थळी खोदले जाणार सहा फुट खोलीचं खंदक; कारण काय? - lok sabha election
  3. संभाजीनगरात 'मशाल' अन् 'धनुष्यबाणात' तुफान राडा ; दोन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी - Lok Sabha Election 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.