ETV Bharat / politics

सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत तणाव वाढला; काँग्रेसचा दावा असताना उबाठा गटाने उमेदवार दिल्यानं नाराजी, विश्वजित कदम विशाल पाटील संतप्त - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 6, 2024, 7:00 PM IST

Vishwajit Kadam Vishal Patil
विश्वजित कदम आणि विशाल पाटील

Lok Sabha Election 2024 : सांगली लोकसभेच्या जागेवरून आज नागपूरमध्ये काँग्रेस नेत्यांनी राज्यभरात निर्माण झालेल्या परिस्थितीवर बैठक घेतली. काँग्रेस नेते विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी सांगलीच्या लोकांच्या भावना या बैठकीत मांडल्या. ते म्हणाले की, सांगलीची जागा ही परंपरागत काँग्रेसची आहे, आमचं मजबूत संघटन आहे. ती जागा लढण्यास आम्ही सक्षम आहोत.

प्रतिक्रिया देताना रमेश चेन्निथला आणि विश्वजित कदम

नागपूर Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीच्या तीन घटक पक्षामधील नेत्यांमध्ये अजूनही एकवाक्यता निर्माण झाली नसल्यानं ताणतणाव वाढत आहे. सूर जुळून येत नसल्यानं आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र आहे. भिवंडी आणि सांगलीच्या जागांवर राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गटानं परस्पर आपले उमेदवार जाहीर केल्यामुळं हा तणाव आणखी वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज नागपूर येथे काँग्रेसच्या महत्वपूर्ण नेत्यांची बैठक पार पडली. यामध्ये काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला आणि महासचिव मुकुल वासनिक यांच्यासह विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) आणि विशाल पाटील (Vishal Patil) उपस्थित होते. तासभर चाललेल्या या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळं पुन्हा या विषयावर बैठक घेतली जाणार आहे.


आम्हाला सांगलीचा इतिहास, भूगोल माहीत आहे : संजय राऊत हे काय बोलतात, यावर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाही. सांगली जिल्ह्याचं समाजकारण, राजकारणाचा इतिहास आणि भूगोल ज्याला माहीत आहे. सांगलीच्या कुठलाही व्यक्तीला विचारलं तर तो सांगेल की, सांगली काँग्रेस विचारधारेचा जिल्हा आहे.


सांगलीच्या विचारधारेत काँग्रेस : सांगली जिल्ह्यात दोन निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे खासदार हे निवडून आले आहेत. मात्र, आता बदल घडावा म्हणून विशाल पाटील यांच्या रुपानं सक्षम उमेदवार आम्ही दिलेला आहे. आम्हाला कुणीही इशारा देऊ नये. काँग्रेस महाराष्ट्रात मजबूत पक्ष आहे. सांगलीच्या घरा घरात काँग्रेसची विचारधारा आहे. त्यामुळं इतर कुणी सांगलीबाबत वक्तव्य कुणी करु नये. काँग्रेस पक्ष सव्वाशे वर्षाचा राष्ट्रीय पक्ष आहे.


कमी लेखू नका : मी राज्यात काम करत असलो तरी आजच्या घडीला मी फक्त सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचा आमदार म्हणून मी इथे आलो आहे. तिन्ही पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पुढे जात असताना, तिन्ही पक्षानं एकमेकांची गरज आहे. याचा अर्थ असा नाही की, कोणी कोणाला कमी लेखलं पाहिजे.


शेवटी पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य असेल : सांगलीबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलेली भावना ही कार्यकर्त्याचं ऐकूनच केलेली आहे. दिल्लीमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी भेट झाली. आज महाराष्ट्राचे प्रभारी यांची भेट झाल्याचं विश्वजित कदम यांनी सांगितलंय.

हेही वाचा -

  1. शिवसेना ठाकरे गटाला बसणार मोठा धक्का; ...म्हणून मी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतोय, माजी मंत्री बबन घोलप यांचा निर्णय - LOK SABHA ELECTION 2024
  2. हुश्श! अखेर उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून मुख्यमंत्र्यांच्या पुत्राची उमेदवारी जाहीर - Devendra Fadnvis
  3. भिवंडीमध्ये मविआत फूट? बाळ्यामामांना रिंगणात उतरवल्यानं बंडखोरीची शक्यता - LOK SABHA ELECTION 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.