ETV Bharat / politics

भिवंडीत महायुतीत फूट? शिवसेनेचं खच्चीकरण करणारे भाजपाचे उमेदवार नको! - Bhiwandi Lok Sabha Constituency

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 7, 2024, 11:11 AM IST

Updated : Apr 7, 2024, 11:23 AM IST

Bhiwandi Lok Sabha Constituency
भिवंडीत महाविकास आघाडीनंतर आता महायुतीतही फूट? शिवसेनेचं खच्चीकरण करणारे भाजपाचे उमेदवार नको शिवसेनेची खदखद

Bhiwandi Lok Sabha Constituency : जागावटपावरुन सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये धुसफूस सुरुच आहे. त्यातच आता भिवंडी लोकसभेत महाविकास आघाडी पाठोपाठ महायुतीतही धुसफूस सुरू झालीय.



ठाणे Bhiwandi Lok Sabha Constituency : मुख्यमंत्री शिंदेंचा जिल्हा असलेल्या ठाणे ग्रामीण भागातील बहुतांश जिल्हा परिषद, पंचायत समित्यासह शेकडो ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात असल्यानं शिंदे गटाच्या शिवसेनेचं वर्चस्व आहे. त्यातच भाजपाचे उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या निष्क्रियतेला आमचा विरोध असून असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे ठाणे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे यांनी म्हटले. भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये कुठल्याही परिस्थितीत उमेदवाराला मदत करणार नाही. पाटील यांनी ग्रामीण भागात शिवसेनेचं खच्चीकरण केलंय. त्यामुळं आमच्या पक्षाचं खच्चीकरण करणाऱ्या भाजपाच्या उमेदवाराला विरोध असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

भिवंडीत महाविकास आघाडीनंतर आता महायुतीतही फूट?

मारुती धिर्डे यांनी भाजपाचे उमदेवार कपिल पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. मागील 10 वर्षात मतदारसंघाच्या विकासाकडे कपिल पाटील यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलंय. हजारो कोटी रुपयांचा निधी खर्च केल्याचा दावा केला जात असला तरी तो निधी विकासकामांमध्ये दृश्यस्वरुपात पहायला मिळत नाही, असाही आरोप ठाणे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे यांनी केलाय.

भाजपा युती धर्म पाळत नाही : "आम्हाला केवळ निवडणुकीला गृहीत धरलं जातं. निवडणुका झाल्या की आम्हाला बाजूला सारलं जातं. मागील विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपानं शिवसेनेचा उमेदवार पाडला. गेली दहा वर्ष शिवसेना संपवण्याचं काम भाजपानं केल्याचा आरोप धिर्डे यांनी केलाय. "आम्ही युती धर्म पाळतो. परंतु भाजपा युती धर्म पाळत नाही. ही युती अखेरपर्यंत राहील याची पुनरुच्चारही त्यांनी केला. जिल्हा परिषद सदस्य हे शिवसेनेचे होते. पंचायत समिती, नगरपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समिती या शिवसेनेच्या ताब्यात आहेत. त्यामुळं या मतदारसंघावर आमचाच अधिकार असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. आम्ही या जागेवर आग्रही आहोत. ही जागा यापुढे धोक्यात असल्यानं आम्हाला इथं प्रतिनिधित्व देण्याची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. ती पूर्ण होईल" अशी आशा धिर्डे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

कपिल पाटील काय म्हणाले : भाजपा उमेदवार कपिल पाटील यांनी आरोपावर प्रत्युत्तर दिले. पाटील म्हणाले, "महायुतीच्या नेत्यांनी एकत्रित बसून माझी उमेदवारी जाहीर केलीय. त्यांना वाटत असेल निवडणुक लढायची तर त्यात चुकीचं काही नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाकडे तशी मागणी करावी. कालपर्यंत ते प्रचार करत होते. नाराजी असती तर संवाद मेळावा झाला नसता. त्यांची नाराजी दूर करण्यात येईल."

शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता : महायुतीच्या जागा वाटपात भिवंडी लोकसभा मतदारसंघ मागील दोन वर्षाच्या पंचवार्षि प्रमाणे याही वर्षी भाजपाच्या ताब्यात गेल्यानं शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली. भिवंडी मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये भिवंडी पश्चिममधून भाजपचे महेश चौघुले आमदार आहेत. भिवंडी पूर्वमधून समाजवादीचे रईस शेख, कल्याण पश्चिम शिंदे गटाचे विश्वनाथ भोईर, शहापुरमधून अजित पवार गटाचे दौलत दरोडा, मुरबाड मधून भाजपाचे किसन कथोरे आमदार आहेत.

हेही वाचा :

  1. "फडणवीसांनी एकदाही अजित पवारांचा उल्लेख...", अमोल कोल्हे यांची जोरदार टोलेबाजी - Lok Sabha Election 2024
  2. एकनाथ खडसे भाजपात प्रवेश करणार, देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी काय म्हणाले? - eknath khadse to Join BJP
Last Updated :Apr 7, 2024, 11:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.