ETV Bharat / entertainment

अभिनेता यश आगामी चित्रपटात शाहरुख खानसोबत काम करणार? वाचा तपशील

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 30, 2024, 11:42 AM IST

Yash
अभिनेता यश

Yash and SRK Together : केजीएफ फेम अभिनेता यशने शाहरुख खानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. नितेश तिवारीच्या रामायणमधून हा अभिनेता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

मुंबई - Yash and SRK Together : 'केजीएफ' फेम अभिनेता यश नितेश तिवारीच्या महत्त्वाकांक्षी 'रामायण' या आगामी चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याशिवाय अशी चर्चा आहे की यश त्याच्या दुसऱ्या हिंदी प्रोजेक्टसाठी आधीच चर्चेत आहे आणि त्याने अभिनेता शाहरुख खानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तो त्याच्या आगामी चित्रपटांची निवड करण्यात गुंतला आहे.

'केजीएफ' ट्रायलॉजीच्या यशामुळे प्रसिद्धीस आलेला हा कलाकार नितेश तिवारीच्या 'रामायण' चित्रपटात रावणाची भूमिका साकारणार आहे. यशला माहिती आहे की, केजीएफ फ्रँचायझीच्या यशामुळे त्याला हिंदी प्रेक्षकांमध्ये मोठा चाहता वर्ग मिळाला आहे. यामुळेच आपल्या प्रेक्षकांचा विस्तार वाढवण्यासाठी तो आगामी काळात पावले उचलणार आहे.

सध्ये यश 'केजीएफ'च्या आगामी भागाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. तसेच रामयणाचेही शूटिंग त्याच्या हातात असतानाही तो आपली गती अधिक वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. तो रेड चिलीज एंटरटेनमेंटसोबत त्याच्या आगामी चित्रपटाबाबत चर्चा करत आहे. अशा बातम्या आल्या आहेत की त्याने अभिनेता शाहरुख खानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दोघांनाही एकत्र काम करण्यात रस आहे आणि आपल्या चाहत्यांना मनोरंजनाचा धमाका भेट देण्याची इच्छा आहे.

अभिनेता यश आगामी नितेश तिवारीच्या 'रामायण' चित्रपटासाठी 150 कोटी रुपये मागत असल्याचीही एक र्चा आहे. या चित्रपटात रणबीर कपूर भगवान राम आणि साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत आहेत. रावणाच्या भूमिकेसाठी निवड झालेला यश त्याच्या चित्रपटासाठी किमान 100 कोटी इतकी फी आकारतो. शूटिंग शेड्यूल, आवश्यक कालावधी यावर तो या फीमध्ये वाढही करु शकतो.

अभिनेता यशचा अलिकडेच सालार हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला होता. 'सालार भाग 1 - सीझफायर'ने जागतिक बॉक्स ऑफिसवर 700 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या सीक्वेलचे काम सध्या सुरू आहे. होंबळे फिल्म्सद्वारे निर्मित, हे चित्रपटाचे दोन भाग मन्नार, शौर्यांगस आणि घनियार या तीन जमातींनी शासित असलेल्या खानसार या काल्पनिक शहरात दोन बालपणीच्या मित्रांचे शत्रू बनल्याची कथा आहेत. जेव्हा मन्नार वर्चस्व मिळवण्याची अपेक्षा बाळगतात तेव्हा संघर्ष निर्माण होतो आणि एकेकाळी अविभाज्य मित्रांमध्ये फूट निर्माण होते.

'सालार'च्या यशाला प्रभासच्या करिअरमध्ये महत्त्व आहे. 'बाहुबली' भाग 1 आणि 2 च्या प्रचंड यशानंतर, प्रभासला अलीकडे यश हुलकावणी देत होते. 'सालार'चे व्यावसायिक यश हा अभिनेता प्रभाससाठी एक महत्त्वाचा क्षण ठरला आहे, जो त्याच्या संपूर्ण भारतातील स्टारडमला साजेशा यश मिळवत असल्यानं त्याच्या चाहत्यांमध्येही उत्साह संचारला आहे.

हेही वाचा -

  1. आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे लोल्लापलूझा इंडियाच्या कार्यक्रमात झाले एकत्र स्पॉट
  2. भावूक झालेल्या फॅनसाठी शाहरुख खानही झाला हळवा, व्हिडिओ व्हायरल
  3. आयुष्मान खुरानानं दिली मुंबईत साऊथ कोरियन गायक एरिक नमला ट्रिट
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.