ETV Bharat / entertainment

'आरआरआर'मधील 'नाटू नाटू'ची 2024 च्या ऑस्कर सोहळ्यातही क्रेझ, रामचरणने शेअर केला व्हिडिओ

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 12, 2024, 4:58 PM IST

Naatu Naatu at Oscars 2024: यंदा पार पडेल्या 2024 च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातही पुन्हा एकदा 'आरआरआर'मधील 'नाटू नाटू' गाण्याची क्रेझ पाहायला मिळाली. या गाण्याची क्लिप सोहळ्यात झळकल्यानंतर त्याचा व्हिडिओ अभिनेता रामचरणने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Naatu Naatu Features at Oscars 2024
'आरआरआर'मधील 'नाटू नाटू'

मुंबई - Naatu Naatu at Oscars 2024: दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला गेल्या वर्षी ऑस्कर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. त्यानंतर हे गाणं जगभर लोकप्रिय झालं. अनेक देशात या गाण्याचे फॅन्स तयार झाले. अनेकांनी त्यावर रील्सही बनवले. आजही या गाण्याची भुरळ थेट ऑस्कर संयोजकांना अजूनही पडली आहे. या चित्रपटाला कोणतेही नामांकन मिळाले नसले तरी, राजामौलीच्या चित्रपटाची ही उत्कृष्ट रचना ऑस्कर 2024 मोंटाजमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. यामध्ये ज्युनियर एनटीआर आणि राम चरण अभिनीत 'नाटू नाटू'मधील दृश्यांचा समावेश होता.

11 मार्च रोजी, लॉस एंजेलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये 96 व्या अकादमी पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. यातील एका प्रसंगात जेव्हा रायन गॉस्लिंग आणि एमिली ब्लंट यांनी स्टंट नृत्यदिग्दर्शक आणि हाय ऑक्टेन चित्रपटांच्या दिग्दर्शकांना सन्मानित करण्यासाठी मंचावर बोलवण्यात आले तेव्हा त्यांच्या मागे एलईडी स्क्रीनवर राजामौली चित्रपटाचे सीक्वेन्स दाखवण्यात आले. यामध्ये रामचरण आणि एनटीआर यांची झलक पुन्हा पाहायला मिळाली.

स्टंटमन आणि अ‍ॅक्शन क्रूचे नामांकन करण्यासाठी रायन आणि एमिली स्टेजवर हजर राहून ऑस्कर-नामांकित कलाकारांनी स्टंटमनचे कौतुक केले, तर अकादमी अवॉर्ड्सने जागतिक चित्रपटातील अ‍ॅक्शन सीक्वेन्सचे आठवण करुन देणारा व्हिडिओ प्ले केला. यामध्ये 'आरआरआर'मधील राम चरण आणि ज्युनियर एनटीआरचा अ‍ॅक्शन सीक्वेन्सही स्क्रीनवर दाखवण्यात आला होता.

Naatu Naatu Features at Oscars 2024
'आरआरआर'मधील 'नाटू नाटू'ची क्रेझ

दुसऱ्या एका प्रसंगात, सिंथिया एरिव्हो आणि एरियाना ग्रँडे सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी दाखल झाल्या तेव्हा ऑस्कर विजेत्या गाण्याचे क्लिप मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आले. ऑस्कर 2024 हे वर्ष आरआरआरमधील नाटू नाटू गाणे स्टजवर दिसल्याने एक वेगळे चैतन्य उपस्थितांसह 'आरआरआर' टीमच्या सकाऱ्यांमध्ये पाहायला मिळाले. अभिनेता राम चरणने इंस्टाग्रामवर प्रतिक्रिया दिली आहे, व्हिडिओ ऑनलाइन पाहिल्यानंतर आश्चर्य व्यक्त केले आहे.

राम चरणने हा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर कॅप्शनसह पोस्ट केला, 'ऑस्करच्या मंचावर पुन्हा आश्चर्य. किती सन्मान आहे' असे कॅप्शन त्यानं व्हिडिओला दिलं. 'नाटू नाटू' गाण्याला गेल्या वर्षी 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा अकादमी पुरस्कार मिळाला होता. संगीतकार एमएम कीरवानी आणि गीतकार चंद्रबोस यांनी संपूर्ण टीमच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला होता.

एसएस राजामौली दिग्दर्शित 'आरआरआर'ला 95 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट आणि 'नाटू नाटू'साठी सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी नामांकन मिळाले. या चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी कोमाराम भीम आणि अल्लुरी सीतारामराजू या काल्पनिक व्यक्तींच्या भूमिकेत भूमिका केल्या होत्या. आलिया भट्ट आणि अजय देवगण यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. हे गाणे एमएम कीरावानी यांनी संगीतबद्ध केले असून, चंद्रबोस यांनी गीते लिहिली आहे, तर राहुल सिपलीगुंज आणि काळ भैरव यांनी गाणे रेकॉर्ड केले आहे.

हेही वाचा -

  1. आयुष शर्मा अभिनीत 'रुस्लान' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित ; पाहा व्हिडिओ
  2. Krystyna Pyszkova : मिस वर्ल्ड क्रिस्टिना पिस्कोव्हाला 'या'मुळे आवडतो शाहरुख खान
  3. सनी देओल स्टारर 'द हिरो'चे निर्माते धीरजलाल शाह यांचं अवयव निकामी झाल्यानं निधन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.