ETV Bharat / entertainment

टायगर श्रॉफने पुण्यात खरेदी केली 7.5 कोटी रुपयांचे एक आलिशान मालमत्ता

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 19, 2024, 4:41 PM IST

Tiger Shroff invests in property
टायगर श्रॉफने पुण्यात खरेदी केली मालमत्ता

टायगर श्रॉफने पुण्यामध्ये 7.5 कोटी रुपयांचे एक आलिशान मालमत्ता खरेदी केली आहे. ही मालमत्ता त्याने एका शीतपेय बनवणाऱ्या कंपनीला भाडेतत्वावर दिली आहे.

मुंबई - बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ केवळ चित्रपटातील अभिनयामुळेच नाही तर त्याच्या स्टाईलमुळेही नेहमी चर्चेत असतो. जादुई करिष्मा आणि अ‍ॅक्शन-पॅक भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या टायगरने अलीकडेच एक मोठा स्थावर मालमत्तेचा सौदा केला आहे. त्यानं पुण्यात तब्बल 7.5 कोटी रुपयांचे एक आलिशान मालमत्ता खरेदी केली आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ' या आगामी चित्रपटात काम करत असलेल्या टायगरने हे घर मोठ्या रक्कमेसह भाड्याने दिले आहे.

टायगर श्रॉफने खरेदी केलेली ही मालमत्ता हडपसर येथील पंचशील यूपुणे प्रकल्पात आहे आणि 5 मार्च 2024 रोजी ASN प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडकडून खरेदी करण्यात आली आहे. या मालमत्तेचे क्षेत्रफळ 4248 चौरस फूट जागेचे आहे. असाइनमेंट डीडनुसार टायगरने मालमत्तेसाठी 52.5 लाख रुपये स्टॅम्प फी भरली. प्रसिद्ध स्थानिक रिअल इस्टेट फर्म पंचशील रियल्टीने विकसित केलेले हे अपमार्केट हाऊस टायगर श्रॉफच्या अभिरुचीला पुरक असे भव्य आणि लक्झरियस आहे.

टायगर श्रॉफने मालमत्ता खरेदी केल्यानंतर ताबडतोब भाडेतत्त्वावर देण्याचा त्यानं घेतलेला निर्णय व्यवहारवादी आहे हे लक्षात घेण्याजोगे आहे. हा विवेकपूर्ण निर्णय केवळ त्याच्या पोर्टफोलिओमध्ये मौल्यवान मालमत्तेची भर घालत नाही तर मासिक भाड्याने 3.5 लाख रुपये उत्पन्न देखील मिळवून देतो. रजा आणि परवाना करारानुसार त्याच दिवशी मालमत्ता चेरीस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला भाड्याने देण्यात आली होती. भाडेपट्टी पाच वर्षांसाठी असून भाडेकरूने १४ लाख रुपये अनामत रक्कम भरली आहे. त्यात कागदपत्रानुसार 5% वार्षिक भाडेवाढ समाविष्ट आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही मालमत्ता शीतपेयांचा व्यवसाय करणाऱ्या एका खाजगी कंपनीला लीजवर दिली आहे. बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि तिच्या वडिलांनी या वर्षाच्या सुरुवातीला मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात कंगना रणौतच्या कुटुंबाकडून 10 कोटी रुपयांचे दोन अपार्टमेंट खरेदी केले होते. मालमत्तेच्या कागदपत्रांनुसार, गेल्या वर्षी बोनी कपूर आणि त्यांच्या मुली जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांनी अंधेरी वेस्ट, मुंबई येथे 12 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीत चार मालमत्ता विकल्या होत्या.

हेही वाचा -

1. Priyanka Chopra : प्रियांका चोप्रानं निक जोनास आणि मालतीबरोबरचे दुबई व्हॅकेशन फोटो आणि व्हिडिओ केले शेअर

2. केरळमध्ये मोठ्या संख्येनं चाहत्यांच्या गर्दीनंतर थलपथी विजयच्या कारचं झालं नुकसान

3. ऐश्वर्या राय बच्चननं आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त शेअर केली भावनिक पोस्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.