ETV Bharat / entertainment

'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' चित्रपटाचं आगाऊ बुकिंग जोरदार सुरू

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 8, 2024, 7:13 PM IST

TBMAUJ Movie : शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन स्टारर चित्रपट 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' उद्या प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटानं आतापर्यंत किती तिकिटे विकली आहेत हे पाहूया.

TBMAUJ Movie
तेरी बातों में ऐसा उल्झा जिया चित्रपट

मुंबई TBMAUJ Movie : अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन स्टारर 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' हा चित्रपट उद्या 9 फेब्रुवारीला चॉकलेट डेच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन पहिल्यादांच एकत्र दिसत आहेत. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट रिलीजच्या उंबरठ्यावर उभा आहे. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अमित जोशी आणि आराधना साह यांनी केलंय. चित्रपटाचा ट्रेलर अनेकांना आवडला आहे. 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' या चित्रपटात क्रिती सेनॉन रोबोटच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय शाहिद कपूर हा रोबोटिक तज्ञाच्या भूमिकेत असणार आहे. शाहिदचा हा चित्रपट रोमँटिक कॉमेडी ड्रामा आहे. 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' चित्रपटाची वाट अनेकजण बऱ्याचं दिवसांपासून पाहात होते, असं चाहत्यांनी या चित्रपटाच्या ट्रेलरच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत सांगितलं आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया'चे आगाऊ बुकिंग : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' चित्रपटानं पहिल्या दिवशी 8330 शोमध्ये 59 हजार तिकिटांची विक्री करून 1.28 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवशी खूप कमाई करेल असं सध्या दिसत आहे. 75 कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर, हा चित्रपट पहिल्या दिवशी 7 ते 8 कोटी रुपये कमावणार आहे. या चित्रपटामध्ये शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन व्यतिरिक्त डिंपल कपाडिया, राकेश बेदी, राजेश कुमार, आशीष वर्मा, धर्मेंद्र, अर्जुन पांचल आणि इतर कलाकार दिसणार आहेत. रजनीकांतचा 'लाल सलाम' चित्रपटही 9 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'तेरी बात में ऐसा लगा जिया' चित्रपटाबद्दल

  • स्क्रीन काउंट- 2500 (चित्रपट अंदाजे 2500 स्क्रीनवर प्रदर्शित होणार आहे.)
  • प्रमाणपत्र - U/A (सेन्सॉरनं चित्रपटातील काही चुंबन दृश्यांना कात्री लावली आहे.)
  • रनटाइम 143.15 मिनिटे (2 तास 23 मिनिटे आणि 15 सेकंद)
  • दिग्दर्शक- अमित जोशी आणि आराधना साह
  • निर्माता- दिनेश विजन, ज्योती देशपांडे, लक्ष्मण उतेकर
  • बजेट- 75 कोटी

हेही वाचा :

  1. यामी गौतम स्टारर 'आर्टिकल 370'चा ट्रेलर रिलीज ; पाहा व्हिडिओ
  2. संगीतकार प्यारेलाल शर्मा यांचा लक्ष्मीनारायण आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव
  3. 'शिवरायांचा छावा'मध्ये बहिर्जी नाईकची ऐतिहासिक भूमिका साकारणार रवी काळे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.