ETV Bharat / entertainment

बेकायदेशीर आयपीएल स्ट्रीमिंग प्रकरणी मुंबई सायबर सेलकडे तमन्ना भाटियानं मागितला वेळ - tamannaah bhatia

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 29, 2024, 4:21 PM IST

Illegal IPL Streaming Case
बेकायदेशीर आयपीएल स्ट्रीमिंग केस

Illegal IPL Streaming Case : बेकायदेशीर आयपीएल स्ट्रीमिंग प्रकरणी तमन्ना भाटियाला मुंबई सायबर सेलनं समन्स बजावला होता. तिला आज 29 एप्रिल रोजी हजर राहायचं होतं. याप्रकरणी तिनं आता वेळ मागितला आहे.

मुंबई - Illegal IPL Streaming Case : अवैध इंडियन प्रीमियर लीग स्ट्रीमिंग प्रकरणी तमन्ना भाटियाला 25 एप्रिल रोजी समन्स बजावण्यात आला आहे. महादेव ऑनलाइन गेमिंग ॲपशी संबंधित एका कथित ॲपच्या जाहिरातीप्रकरणी तिला महाराष्ट्र सायबर सेलनं समन्स बजावल्यानंतर ती आता अडचणीत सापडली आहे. आज तिला 29 एप्रिल रोजी या प्रकरणी सायबर सेलच्या कार्यलयात हजर राहायचे होते. या प्रकरणी प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस यांची चौकशी करण्यात आली आहे. याशिवाय या प्रकरणी साहिल खानला अटक करण्यात आली असून तो 1 मेपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहे.

बेकायदेशीर IPL स्ट्रीमिंग प्रकरण : फेअरप्ले हे बेटिंग एक्सचेंज प्लॅटफॉर्म आहे. या ॲपद्वारे क्रिकेट आणि बाकी इतर काही खेळांवर बेटिंग लावली जाते. 2023मध्ये या ॲपवर आयपीएलचे सामने दाखवण्यात आले होते. आपीएलचा स्टीमिंग अधिकार वायकॉम 18कडे होते. या कंपनीनं याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. यामुळे वायकॉम 18 समूहाला 100 कोटी रुपयांचं नुकसान झाल असल्याचं समजत आहे. याच प्रकरणी अभिनेता संजय दत्तला देखील 23 एप्रिलला समन्स बजवण्यात आलं होता, यानंतर त्यानं भारतात नसल्यानं सांगिलतं आणि चौकशीसाठी वेळ मागितला. रिपोर्टनुसार तमन्ना भाटियानं या ॲपसाठी जाहिरात केली होती.

वेगवेगळ्या कंपनीच्या बँक खात्यातून दिले गेले स्टार्स पैसे : आता याविषयी पोलिसांना साक्षीदार म्हणून तिच्याकडून काही माहिती घ्यायची आहे, मात्र आता तमन्ना हजर राहण्याऐवजी आणखी वेळ मागितला आहे. मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी या बेटिंग एक्सचेंज प्लॅटफॉर्म खेळ आणि मनोरंजन संबंधित जुगार खेळला जातो. हे ॲप महादेव ऑनलाइन गेमिंग ॲपची उपशाखा असल्याचं समोर येत आहे. याशिवाय प्रकरणात अडकलेल्या स्टार्सला वेगवेगळ्या कंपनीच्या खात्यातून पैसे देण्यात आले आहेत. पोलिसांना तपासात या ॲपशिवाय इतरही ॲपच्या माध्यमातून पाकिस्तानला देखील पैसे दिले जात आहे. दरम्यान तमन्नाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती 'वेदा' चित्रपटामध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. शिल्पा शेट्टी आपल्या मुळांपाशी परतली! मुलांसह घेतला 'दैवा कोला'चा विस्मयकारक अनुभव - SHILPA WATCHES DAIVA KOLA
  2. 'इंटरनॅशनल डान्स डे' : शाहिद कपूरसह जॅकी भगनानीनं चाहत्यांना दिल्या 'डान्स डे'च्या शुभेच्छा - international dance day 2024
  3. 'पिकू'च्या सेटवर इरफानला पाहून घाबरली होती दीपिका पदुकोण, 'राणा'बरोबरच्या आवडत्या क्षणांना दिला उजाळा - IRRFAN KHNA DEATH ANNIVERSARY
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.