ETV Bharat / entertainment

बॅडमिंटन खेळाडू मॅथियास बोएबरोबरच्या खासगी लग्नाबद्दल तापसी पन्नूनं केला खुलासा - taapsee pannu and wedding

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 10, 2024, 12:20 PM IST

Taapsee Pannu : तापसी पन्नूनं बॅडमिंटन खेळाडू मॅथियास बोएबरोबरच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे. तिनं दिलेल्या एका मुलाखतीत लग्नाबद्दल सांगितलं आहे.

Taapsee Pannu
तापसी पन्नू

मुंबई - Taapsee Pannu : हिंदी चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्री तापसी पन्नू गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. ती बऱ्याच काळपासून बॅडमिंटन खेळाडू मॅथियास बोएला डेट करत आहे. काही दिवसापूर्वी तापसीचं लग्न झाल्याची बातमी समोर आली होती. यानंतर तापसीनं या सर्व बातम्यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आता तापसीनं या बातम्यांवर मौन सोडलं आहे. मॅथियासबरोबर लग्न केल्याचं तिनं एक मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे. मुलाखतीत तापसीनं तिच्या गुप्त लग्नाबद्दल सांगताना म्हटलं, ''मला नाही वाटत की मी माझे वैयक्तिक आयुष्य जजमेंटसाठी खुलं करावं, मला नाही माहित की जर मी काही गोष्टी शेअर केल्या तर मी कसं फिल करेल. मी सर्व काही माझ्यापर्यतच ठेवलं आहे.''

तापसी पन्नूनं लग्नाबद्दल केला खुलासा : तापसीनं सांगितलं की, ''लग्न खासगी करण्याचा माझा कोणताही हेतू नाही. माझे जवळचे लोक, जे सेलिब्रेशनचा भाग होते, त्यांना माहित होत की मला कसे लग्न करायचे आहे. मला अशा प्रसंगी माझ्या जवळच्या लोकांबरोबर राहायचे होते. मी लग्नाला सार्वजनिक प्रकरण बनवले नाही कारण लोक ते कसे पाहतील याबद्दल काळजी वाटते.'' तापसी पन्नूची बहीण शगुन पन्नू देखील लग्नाला उपस्थित होती, तिनं तिच्या बहिणीच्या लग्नाचे कार्य हाताळले असल्याचं समजत आहे.

वर्कफ्रंट : तापसीचा सध्या लग्नाचे फोटो शेअर करण्याचा कोणताही विचार नाही. यासाठी ती मानसिकदृष्ट्या तयार नाही. जर तिला वाटलं की फोटो तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करावा, त्यावेळी ती नक्की करेल असं तिनं सांगितलं. दरम्यान तापसीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल तर ती शेवटी 'डंकी' चित्रपटामध्ये शाहरुख खानबरोबर दिसली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलं होत. आता ती बहुप्रतीक्षित चित्रपट 'फिर आयी हसीन दिलरुबा' मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 2021 च्या क्राईम-सस्पेन्स चित्रपट 'हसीन दिलरुबा' चा सीक्वेल आहे जो लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.

हेही वाचा :

  1. "सारी दुनिया जला देंगे", म्हणत अनंत अंबानींच्या बर्थडे पार्टीत सलमान खान झाला सामील - Salman Khan Joins B Praak
  2. 'हिरामंडी'त संधी दिल्याबद्दल फरदीन खाननं मानले संजय लीला भन्साळींचे आभार - Fardeen khan and Heeramandi
  3. अंकिता लोखंडे 'आम्रपाली' वेब सीरीजमध्ये दिसणार, निर्मात्यांनी केलं पोस्टर शेअर - ANKITA LOKHANDE
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.