ETV Bharat / entertainment

अंकिता लोखंडे 'आम्रपाली' वेब सीरीजमध्ये दिसणार, निर्मात्यांनी केलं पोस्टर शेअर - ANKITA LOKHANDE

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 9, 2024, 5:28 PM IST

Ankita Lokhande Amrapali: 'आम्रपाली' वेब सीरीजमध्ये अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता या वेब सीरीजच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केलं आहे, ज्यामध्ये अंकिता दिसत आहे.

Ankita Lokhande Amrapali
अंकिता लोखंडे आम्रपाली

मुंबई - Ankita Lokhande Amrapali: 'स्वातंत्र्य वीर सावरकर'नंतर अभिनेत्री अंकिता लोखंडे चित्रपट निर्माते संदीप सिंग यांच्या 'आम्रपाली' वेब सीरीजमध्ये दिसणार आहे. या वेब सीरीजमध्ये अंकिता 'नगरवधू' आम्रपालीच्या भूमिकेत असेल. संदीप सिंगनं इन्स्टाग्रामवर आपल्या चाहत्यांना सरप्राईज देत एक पोस्ट शेअर केलं आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, ''मी अंकिता लोखंडेला आम्रपालीच्या रूपात सादर करत आहे, जी शक्तीचे प्रतीक आहे. ही मनमोहक मालिका एका शाही गणिकेची गाथा उलगडणार. भावना आणि आव्हानांनी भरलेला प्रवास, या उत्कंठावर्धक कामगिरीसाठी सोबत राहा, लीजेंड स्टुडिओज निर्मित ही वेब सीरीज संगीतकार इस्माईल दरबारच्या बहुप्रतीक्षित पुनरागमनाचे प्रतीक आहे.''

'आम्रपाली' वेब सीरीज अंकिता लोखंडे दिसणार : या वेब सीरीजमध्ये 'आम्रपाली'चा शाही गणिका होण्यापासून ते बौद्ध भिक्षु होण्यापर्यंतचा प्रवास मांडण्यात येणार आहे. या वेब सीरीजमध्ये आम्रपालीच्या आयुष्यातील उतार - चढाव आणि ती कशी सर्व सुखसोयींचा त्याग करून बौद्ध भिक्षु म्हणून ब्रह्मचर्य स्वीकारते हे सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आता अंकिताला 'आम्रपाली'च्या भूमिकेत पाहाण्यासाठी तिचे अनेक चाहते उत्सुक आहे. दरम्यान व्हायरल होत असलेल्या पोस्टरमध्ये अंकिता उडत्या केसांसह, ओढणीनं वेढलेला ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. आता तिच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करून तिला तिच्या आगामी 'आम्रपाली' सीरीजसाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत.

वर्कफ्रंट : अंकिताच्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर'मधील अभिनयाचे सध्या कौतुक होत आहे. या चित्रपटानं आतापर्यत बॉक्स ऑफिसवर 21 कोटीची कमाई केली आहे. हा चित्रपट 20 कोटीच्या बजेटमध्ये बनला होता. या चित्रपटानं रुपेरी पडद्यावर चांगली कामगिरी केली आहे. 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटाचं दिग्दर्शन अभिनेता रणदीप हुड्डानं केलं होतं. याशिवाय त्यानं या चित्रपटामध्ये सावरकरांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 22 मार्च रोजी हिंदी आणि मराठी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित झाला. दरम्यान अंकिताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं टीव्ही मालिका 'पवित्र रिश्ता'पासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या मालिकेत तिच्याबरोबर दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत दिसला होता.

हेही वाचा :

  1. माधुरी दीक्षितसह रितेश देशमुखनं गुढीपाडव्याच्या दिल्या शुभेच्छा, व्हिडिओ व्हायरल - MADHURI DIXIT AND RITEISH DESHMUKH
  2. 'बडे मियाँ छोटे मियाँ'ची रिलीज डेट पुढे ढकलली ; अक्षयसह टायगरनं शेअर केला व्हिडिओ - bade miyan chote miyan release date
  3. 'रामायण' चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी रणबीर कपूरचा फिटनेस प्रशिक्षण घेतानाचा व्हिडिओ व्हायरल - ranbir kapoor fitness training
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.