ETV Bharat / entertainment

श्वानाबरोबरच्या फोटोमुळे सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलच्या डेटिंगबद्दल पसरल्या अफवा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 7, 2024, 10:49 AM IST

Sara Tendulkar and Shubman Gill : सोशल मीडियावर सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलचा फोटो व्हायरल झाला आहे. आता हा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याच्या नात्याबद्दलच्या चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे.

Sara Tendulkar and Shubman Gill
Etv Bharat

मुंबई - Sara Tendulkar and Shubman Gill: सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल हे दोघे सतत चर्चेत असतात. या दोघांबद्दल सोशल मीडियावर खूप चर्चा होताना दिसत आहे. अलीकडेच दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या आल्या होत्या. आजपर्यंत दोघेही या प्रकरणावर काही बोलले नाहीत. 2023च्या विश्वचषकादरम्यानही या दोघांच्या नात्याबद्दल खूप चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा साराच्या नात्याबद्दल चर्चा रंगू लागली असून यावेळी सारा तेंडुलकरच्या एका फोटोवरून लोकांना इशारा मिळाला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांचा नात्याबाबतचा संभ्रम दूर झाला आहे. काही दिवसांपूर्वी शुभमन गिलनेही एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये त्याच्याजवळ एक श्वान बसलेला होता. आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोत सारा एका श्वानाबरोबर आहे. शुभमन गिलजवळ असाच पाळीव श्वान असल्यानं अनेकजण दावा करत आहेत. आता शुभमनचा श्वानबरोबर असणार फोटो एक्सवर शेअर करण्यात आला आहे.

सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलचा फोटो व्हायरल : नुकतीच सारा तेंडुलकर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शन्समध्ये सहभागी होण्यासाठी तिच्या कुटुंबासह जामनगरला पोहोचली होती. तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी एका फेअर थीम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी सारा तेंडुलकरनं लाल रंगाचा लेहेंगा घालून फोटो क्लिक केले होते. यातील एका फोटोमध्ये लोकांना साराबरोबर एक पाळीव श्वान दिसला होता. यानंतर शुभमन आणि साराच्या नात्याबद्दल चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली. सारा अनेकदा शुभमन गिलला त्याच्या क्रिक्रेट सामान्यासाठी सोशल मीडियावर शुभेच्छा देताना दिसत असते.

सारा आणि शुभमन एकत्र दिसले : शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर एका पार्टीत एकत्र दिसले होते. हे दोघेही अंबानी कुटुंबाच्या जीओ प्लॉझा( Jio Plaza) लॉन्च इव्हेंटमध्ये पोहोचले होते. दोघांना एकत्र बघून लोकांनी अंदाज बांधला की, त्यांचं नातं पक्क झालं आहे. त्यानंतर ती शुभमनला पाठिंबा देण्यासाठी क्रिकेट सामना पाहायला आली होती. इतकंच नाही तर त्याला बाद केल्यानंतर ती भावूकही होताना दिसली. आता त्यांचे नाते किती खरे आहे हे शुभमन आणि साराच सांगू शकेल. मात्र बरेचदा सारा आणि शुभमनला अनेक सेलिब्रिटी त्याच्या नात्यावरून चिडवताना दिसतात. 'कॉफी विथ करण सीझन 8'मध्ये सारा अली खाननं शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरच्या नात्याबद्दल खुलासा केला होता.

हेही वाचा :

  1. जान्हवी कपूरने वाढदिवसानिमित्त शिखर पहारिया आणि ऑरीसह घेतले तिरुपतीचे दर्शन
  2. अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये बोलावलं नसल्यानं राखी सावंत झाली मुकेश अंबानींवर नाराज
  3. जान्हवी कपूरला कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडियानं दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.