ETV Bharat / entertainment

जान्हवी कपूरला कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडियानं दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 6, 2024, 5:38 PM IST

Janhvi Kapoor Birthday: जान्हवी कपूर आज तिचा 27 वा वाढदिवस साजरा करत आहे. या विशेष दिवशी, तिच्या कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडियानं तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Janhvi Kapoor Birthday
जान्हवी कपूरचा वाढदिवस

मुंबई - Janhvi Kapoor Birthday : अभिनेत्री जान्हवी कपूर 6 मार्च रोजी आपला 27 वा वाढदिवस साजरा आहे. या खास दिवशी तिला अनेकजण सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान जान्हवीला कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडियानं या विशेष प्रसंगी एक सुंदर पोस्ट शेअर करून वाढदिवसाच्या रोमँटिक शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. आता या जोडप्याच्या नात्याबद्दलचा खुलासा झाला आहे. आज, 6 मार्च रोजी, शिखर पहाडियानं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर जान्हवी कपूरबरोबरचा दोन फोटो शेअर करून अनेकांना आश्चर्यचा धक्का दिला आहे. आता या जोडप्याचं नात जगजाहीर झालं आहे.

Janhvi Kapoor Birthday
जान्हवी कपूरचा वाढदिवस

शिखर पहाडियानं जान्हवी कपूरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा : व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये जान्हवी ही शिखरबरोबर आयफेल टॉवरसमोर उभे राहून त्याकडे पाहताना दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये शिखरनं लिहिलं, ''हॅपी बर्थडे'' आणि एक रेड हार्ट इमोजीसह शुभेच्छा दिल्या आहेत. फोटोमध्ये दोघेही ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत आहेत. पुढील इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शिखरनं जान्हवी कपूरचा पाळीव श्वानबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. यावर त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'लव्ह फ्रॉम ऑल युअर बेबीज'. जान्हवी तिच्या पाळीव श्वानबरोबर कॅज्युअल आऊटफिटमध्ये बसलेली दिसत आहे. या फोटोमध्ये ती नो मेकअप लूकमध्ये आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट प्री-वेडिंग : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या तीन दिवसीय प्री-वेडिंग सोहळ्यात जान्हवी कपूर कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडियाबरोबर दिसली होती. रूम्ड कपल जेव्हा जामनगरला पोहोचले तेव्हा दोघेही कॅमेऱ्यात एकत्र कैद झाले होते, तर ग्रँड पार्टी आटोपल्यानंतर दोघेही जामनगरहून मुंबईला जाण्यासाठी रवाना झाले होते. यावेळी शिखर कॅमेऱ्याला दुर्लक्ष करताना दिसला. सध्या तरी दोघांनीही आपलं नातं अधिकृत केलेलं नाही. मात्र अनेकदा हे कथित जोडपे देव दर्शन करण्यासाठी एकत्र जाताना दिसतात. याशिवाय अनेकदा जान्हवी शिखरबरोबर पार्टीला जाताना आणि एकत्र वेळ घालवताना दिसते. काही दिवसापूर्वी जान्हवीनं 'कॉफी विथ करण सीजन 8'मध्ये शिखर नाव घेतलं होतं, त्यानंतर ती खूप चर्चेत आली होती.

हेही वाचा :

  1. कार्तिक आर्यन आणि तृप्ती दिमरी स्टारर 'आशिकी 3'वर दिलं टी- सीरीजनं स्पष्टीकरण
  2. अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2' चित्रपटात संजय दत्त करणार कॅमिओ?
  3. ‘मैदान’चा ट्रेलर लॉन्चपूर्वी अजय देवगणने शेअर केली मनोरंजक झलक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.