ETV Bharat / entertainment

सलमान खानची भाची आयतचा व्हिडिओ व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल - salman khan

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 15, 2024, 4:32 PM IST

Aayush sharma : सलमान खानची भाची आयतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तिच्याबरोबर तिचे वडील आयुष शर्मा दिसत आहे.

Aayush sharma
आयुष शर्मा ((Aayush sharma - instagram))

मुंबई - Aayush sharma : अभिनेता सलमान खान काही दिवसांपासून त्याच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे चर्चेत आहे. 14 एप्रिल रोजी मुंबईतील वांद्रे भागात असलेल्या सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार झाला होता. दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी सलमान खानच्या घरावर पाच राऊंड फायर केले होते. गोळीबार केल्यानंतर हे आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. आता या प्रकरणाचा तपास मुंबई क्राइम ब्रँच करत आहे. पोलिसांनी आतापर्यंत 6 आरोपींना अटक केली आहे. दरम्यान,अलीकडेच सलमान खानची क्यूट भाची आयतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आयत ही वडील आयुष शर्माबरोबर डान्स करताना दिसत आहे.

सलमान खानची बहीण अर्पिता खाननं शेअर केला व्हिडिओ : सलमान खानची बहीण अर्पिता खाननं तिच्या इन्स्टावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये आयुष शर्मा 'लवयात्री' या त्याच्या पहिल्या चित्रपटातील 'चोगडा तारा' गाण्यावर डान्स करत आहे. वडील आणि मुलीची आता ही जोडी अनेकांना आवडत आहे. यादरम्यान आयत तिच्या क्यूट एक्सप्रेशननं लोकांची मने जिंकत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना अर्पिता खाननं कॅप्शनमध्ये लिहिलं, "मुलीचं हसणं हा प्रत्येक वडिलांचा गुप्त हेतू असतो... अनमोल." अर्पितानं शेअर केलेल्या व्हिडिओवर अनेकजण हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत. या व्हिडिओमध्ये आयुष आपल्या मुलीबरोबर खूप खुश दिसत आहे.

सलमान खान आणि आयुष शर्माचं वर्कफ्रंट : सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'सिकंदर' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ईद 2025 च्या मुहूर्तावर चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. आयुष शर्माच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो नुकताच 'रुस्लान' चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट 26 एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र हा चित्रपट बॉक्स काही खास कमाई करू शकला नाही. 'रुस्लान '25 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. या चित्रपटानं रुपेरी पडद्यावर 3.56 कोटींचे कलेक्शन केलं आहे.

हेही वाचा :

  1. कार्तिक आर्यननं 'चंदू चॅम्पियन'मधील भन्नाट पोस्टर केलं रिलीज - Kartik aaryan
  2. माधुरी दीक्षितची सुनील शेट्टीपासून करिश्मा कपूरपर्यंत 'धक धक' वाढवणारी रील्स - Madhuri Dixit birthday
  3. 'बजरंगी भाईजान' फेम मुन्नी उर्फ हर्षाली मल्होत्रानं 10वीत मिळवले 83 टक्के गुण, ट्रोलर्सची केली बोलती बंद - harshaali malhotra
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.