ETV Bharat / entertainment

'बजरंगी भाईजान' फेम मुन्नी उर्फ हर्षाली मल्होत्रानं 10वीत मिळवले 83 टक्के गुण, ट्रोलर्सची केली बोलती बंद - harshaali malhotra

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 15, 2024, 11:50 AM IST

Harshaali Malhotra 10th Board Result : हर्षाली मल्होत्रानं 10वी परीक्षेच्या बोर्डात 83 टक्के गुण मिळवून आता ट्रोल्सला शांत केलं आहे. तिनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये काही यूजर्सच्या कमेंट्स दिसत आहेत.

Harshaali Malhotra 10th Board Result
हर्षाली मल्होत्राचा 10वी बोर्डाचा निकाल (हर्षाली मल्होत्रा(Harshaali Malhotra - Instagram))

मुंबई - Harshaali Malhotra 10th Board Result : अभिनेता सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' या चित्रपटात छोट्या मुन्नीच्या भूमिकेत दिसलेली हर्षाली मल्होत्रानं दहावीची बोर्ड परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली आहे. 12 मे रोजी सीबीएसईनं दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला होता. आता हर्षालीनं तिचा निकाल चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. हर्षालीला रोज सोशल मीडियावर तिच्या शिक्षणावरून ट्रोल केलं जात होतं. तिला अनेकजण दहावीच्या परीक्षेची आठवण करून देत असत. आता तिनं ट्रोलर्सला शांत केलं आहे. हर्षालीनं तिच्या चाहत्यांना निकालाची गोड बातमी दिली आहे.

'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली दहावी पास : तिनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये काही ट्रोलर्सच्या कमेंट्सही लक्ष वेधणाऱ्या आहेत. एका ट्रोल करणाऱ्या व्यक्तीनं म्हटलं, "बोर्डाच्या परीक्षा आहेत, त्यामुळे अभ्यास करा, रील करून परीक्षा पास होऊ शकत नाही." दुसऱ्या एका युजर्सनं म्हटलं, "तू दिवसभर रील बनवत राहा." आणखी एकानं लिहिलं, "कथ्थक क्लासला गेलात तर पास कसे होणार". अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. हर्षालीनं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "माझ्या नृत्यात सुधारणा करण्यापासून ते माझ्या शिक्षणात यश मिळवण्यापर्यंत, मी योग्य संतुलन राखण्यात यशस्वी झाले, मला 83 टक्के गुण मिळाले. ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि आपला अखंड पाठिंबा दिला त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार."

'बजरंगी भाईजान' चित्रपटाबद्दल : 2015 मध्ये रिलीज झालेल्या सुपरस्टार सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' या चित्रपटात हर्षालीनं एका छोट्या मुलीची भूमिका साकारली होती. यानंतर ती प्रसिद्धीझोतात आली होती. सलमान खान करीना कपूर खान स्टारर 'बजरंगी भाईजान'मध्ये त्याच्याबरोबर मुख्य भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकी देखील दिसला होता. हा चित्रपट सुपरहिट झाला होता. 'बजरंगी भाईजान'चं दिग्दर्शन कबीर खान यांनी केलं होतं. या चित्रपटाची कहाणी हनुमानावरील अतूट श्रद्धा असलेला, पवन 'बजरंगी' चतुर्वेदी भारतात अडकलेल्या एका छोट्या पाकिस्तानी मुलीला मदत करून तिला तिच्या देशात पोहचविण्यासाठी भारत- पाक सीमेला ओलांडून जातो. पाकिस्तानी सीमेवर त्याला काय अडचणी येतात हे या चित्रपटात खूप चांगल्या पद्धतीनं मांडलं गेलं आहे.

हेही वाचा :

  1. संजय कपूरनं केला खुलासा, भाऊ बोनी कपूरनं कठीण काळात दिली नव्हती साथ... - sanjay kapoor
  2. 77 व्या कान फिल्म फेस्टिव्हलमधील प्रतिष्ठित पुरस्कार 'पाल्मे डी ओर'ची झलक व्हायरल - PALME D OR AWARD
  3. शिल्पा शेट्टीची बहीण शमिता एंडोमेट्रिओसिसच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल - Shamita hospitalised
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.