ETV Bharat / entertainment

राहत फतेह अली खाननं मारहाण प्रकरणी मागितली पुन्हा एकदा माफी; व्हिडिओ व्हायरल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 1, 2024, 4:45 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

Rahat Fateh Ali Khan : लोकप्रिय पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खाननं एका व्यक्तीला मारहाण केल्याच्या प्रकरणी पुन्हा एकदा माफी मागतली आहे. त्याचा दिलगिरीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मुंबई - Rahat Fateh Ali Khan : बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक लोकप्रिय गाणी गाणारा पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान सध्या खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये तो त्याच्या घरी काम करत असलेल्या व्यक्तीला बाटलीसाठी बुटांनी मारहाण करताना दिसला होता. मारहाण करत असताना राहत वारंवार 'बाटली' सापडत नसल्याचं सांगत होता. त्याचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांनी आणि चित्रपटसृष्टीतील संगीत दिग्दर्शकांनी पाहिला. यानंतर याप्रकरणी अनेकांनी सोशल मीडियावर याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. यानंतर राहतनं या प्रकरणावर स्पष्टीकरण देत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता.

राहत फतेह अली खान केली दिलगिरी व्यक्त : या व्हिडिओमध्ये त्यानं मारहाण केलेल्या व्यक्तीबरोबर दिलगिरी व्यक्त केली होती. राहतनं घरी काम करत असलेला व्यक्ती हा त्याचा शिष्य असल्याचं सांगितलं होत. त्यानं ज्या व्यक्तीला मारहाण केली, त्या व्यक्तीचं नाव हसनैन आहे. तो देखील या व्हिडिओत सांगत होता की, बाटली ही दिसत नव्हती आणि त्यात पीर साहेबचं पवित्र पाणी होत. मात्र यानंतर लोक आणखी संतप्त झाले आणि राहतवर आणखी टीका करू लागले. आता हे प्रकरण अधिकच चिघळलं आहे. राहतनं आपल्या चाहत्यांसोबत एक व्हिडिओ मेसेज शेअर केला असून पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्ती केली आहे.

व्हिडिओ झाला व्हायरल : या व्हिडिओमध्ये राहतनं म्हटलं, ''माझ्याकडून झालेल्या चुकीबद्दल मला माफी मागायची आहे. सर्व प्रथम, मी अल्लाह तालाला माफी मागतो, अल्लाह मला क्षमा करील, जो सर्व मानवांना समान मानतो. एक माणूस म्हणून मी इतर कोणत्याही माणसाशी असं वागू नये आणि कलाकार म्हणून तर असं वागायला नाही पाहिजे.'' आता शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राहतनं त्याच्या कुटुंबाची, चाहत्यांची आणि संगीत दिग्दर्शकांची माफीही मागितली आहे. याशिवाय त्यानं पुढं सांगितलं, ''माझे कुटुंब 600 वर्षांपासून कव्वालीची कला पुढे नेत आहे. ज्यांनी माझ्यावर बहिष्कार टाकला त्यांचा मी मनापासून आदर करतो, त्यांनी मला सल्ला देण्यासाठी हे केले. ते माझ्यावर प्रेम करतात आणि त्यांना त्यांच्या कलाकाराला असं बघायचे नाही. मी त्या सर्वांची माफी मागतो की, भविष्यात असं पुन्हा होणार नाही. आता तरीही काहीजण राहतला दोषी असल्याचं म्हणत आहे.

हेही वाचा :

  1. धर्मेंद्रची नात निकिता चौधरी थाटामाटात अडकली लग्नबेडीत; फोटो व्हायरल
  2. 'हिरो बाप' जॅकी श्रॉफला टायगर आणि कृष्णाने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
  3. "करण जोहर वाईट हेअरस्टाइल करतो" : मुलगा यशने दिली ब्रेकिंग न्यूज
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.