ETV Bharat / entertainment

करीना कपूरने शेअर केली आफ्रिकन सुट्टीतील 'सेरेंगेती सन'ची झलक - Kareena Kapoor in Serengeti Park

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 23, 2024, 3:44 PM IST

Kareena Kapoor in Serengeti Park : अभिनेत्री करीना कपूर खान कुटुंबासह आफ्रिकन जंगलाची सफर करत आहे. तिनं जगप्रसिद्ध 'द सेरेनगेटी नॅशनल पार्क'ला भेट दिली. इथल्या निसर्गात राहत असतानाचे काही सुंदर फोटो तिनं इनस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले आहेत.

Kareena Kapoor in Serengeti Park
करीना कपूर

मुंबई - Kareena Kapoor in Serengeti Park : आरामदायी, ग्लॅमरस आणि स्टायलिश लाईफसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री करीना कपूर खान सध्या आफ्रिकेत आपल्या कुटुंबीयांसह सहलीचा आनंद घेत आहे. तिनं आपल्या या सुट्टीची एक झलक सोशल मीडियावर शेअर केलीय. यामध्ये निसर्गाचं सुंदर रुप टिपण्याचा तिनं प्रयत्न केला आहे.

बेबो या टोपण नावानं ओळखली जाणारी करीनाने शुक्रवारी तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर द सेरेनगेटी नॅशनल पार्कमधील तिच्या कौटुंबिक सहलीची चाहत्यांना झलक दाखवली. यात तिनं पार्कमधील लँडस्केपचा एक सुंदर फोटो शेअर केलाय. यामध्ये सुर्यांच्या तांबूस किरणांनी ढगांनाही आपल्या रंगात न्हाऊ घातल्याचं दिसतंय. या फोटोला कॅप्शन देताना तिनं "द सेरेनगेटी सन." असं लिहिलंय.

Kareena Kapoor in Serengeti Park
करीनाने दाखवली सुट्टीतील 'सेरेंगेती सन'ची झलक

सेरेनगेटी नॅशनल पार्कचे आकर्षण संपूर्ण जगाच्या पर्यटकांना नेहमीत खुणावत आलंय. लाखो स्थलांतरित वाइल्डबीस्ट, हजारो प्राण्याच्या झुंडी इथं पाहायला मिळतात. सुर्यस्ताच्या वेळी आकाश उधळलेले रंग आणि मैदानावरील प्राण्यांच्या झुंडी पाहण्यासाठी इथं प्रवाशी नेहमी येत असतात. सेरेनगेटी नॅशनल पार्कला कोणत्या ऋतूमध्ये लोक येऊन निसर्गाच्या या जादुई चमत्काराचे साक्षीदार होत असतात.

Kareena Kapoor in Serengeti Park
करीनाची आफ्रिकन जंगलाची सफर

सेरेनगेटी नॅशनल पार्कमध्ये उत्तर टांझानियाचाही समावेश आहे. यात पूर्वेकडील मारा प्रदेश आणि ईशान्य सिमीयू प्रदेशाचा समावेश आहे. सेरेनगेटी हे नाव मसाई शब्द सिरिंगेटवरून आले आहे. जमीन अविरतपणे पसरलेली जागा असा शब्दाचा अर्थ आहे.

कामाच्या आघाडीवर करीना कपूर खान आगामी क्रिती सेनॉन, तब्बू आणि दिलजीत दोसांझ यांच्याबरोबर 'क्रू' चित्रपटामध्ये दिसणार आहे. अलीकडेच, निर्मात्यांनी 'क्रू' च्या ट्रेलरचे लॉन्चिंग केले आणि ते सोशल मीडियावर आधीपासूनच ट्रेंडिंग सुरू झाले आहे.

चित्रपटात, तब्बू, करीना आणि क्रिती या तिघीजणी एअर होस्टेसच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट बालाजी टेलिफिल्म्स आणि अनिल कपूर फिल्म अँड कम्युनिकेशन नेटवर्क बॅनरखाली बनवला आहे. हा चित्रपट 29 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

यापूर्वी हा चित्रपट 22 मार्च रोजी रिलीज होणार होता परंतु निर्मात्यांनी चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. 'क्रू' ही तीन महिलांची कथा संघर्षग्रस्त एअरलाइन उद्योगाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. करिनाकडे रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' चित्रपट देखील आहे. यामध्ये ती अजय देवगण, दीपिका पदुकोण, अक्षय कुमार, रणवीर सिंग आणि टायगर श्रॉफ यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा -

अंकिता लोखंडेच्या सासूचा दृष्टिकोन बदलला, चित्रपट प्रदर्शित होताच म्हणाली- 'माझी सून' - Ankita lokhande

कंगना रणौतच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या तिच्या आगामी चित्रपटाबद्दल... - Kangana Ranaut Birthday

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' ट्रेलरसाठी काउंट डाऊन सुरू!! - Bade Miyan Chote Miyan Trailer

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.