ETV Bharat / entertainment

Panchayat 3 Announcement : जितेंद्र कुमार आणि नीना गुप्ता स्टारर 'पंचायत सीझन3'ची झाली घोषणा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 20, 2024, 10:58 AM IST

Panchayat 3 Announcement : जितेंद्र कुमार आणि नीना गुप्ता अभिनीत 'पंचायत सीझन3'ची घोषणा प्राईम व्हिडिओनं केली आहे. याशिवाय त्यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक पोस्टर शेअर केलं आहे.

Panchayat 3 Announcement
पंचायत सीझन3 घोषीत

मुंबई - Panchayat 3 Announcement : प्राइम व्हिडिओची वेब सीरीज 'पंचायत'चं दोन्ही सीझन लोकांना खूप आवडले आहेत. यात जितेंद्र कुमारनं 'सचिव' ही भूमिका साकारली होती. जितेंद्रच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी खूप पसंत केलं. 'पंचायत'चा पहिला सीझन हिट झाल्यानंतर या वेब सीरीजचा दुसरा सीझन आला होता. हा सीझन देखील अनेकांना खूप आवडला होता. आता अखेर या वेब सीरीजचा तिसरा सीझन येत आहे. प्राइम व्हिडिओने अलीकडेच 'पंचायत सीझन 3' ची घोषणा केली आहे. या सीझनचं एक पोस्टर त्यांनी आता सोशल मीडियावर रिलीज केलंय. जितेंद्र कुमार, नीना गुप्ता आणि रघुबीर यादव अभिनीत मोस्ट अवेटेड 'पंचायत सीझन 3' हा जरा हटके असल्याचं म्हटलं जात आहे.

'पंचायत सीझन 3' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला : 'पंचायत सीझन 3'ची घोषणा मंगळवारी मुंबईत प्राइम व्हिडिओच्या कार्यक्रमात करण्यात आली. प्राइम व्हिडिओनं इंस्टाग्रामवर चाहत्यांसह ही बातमी शेअर करत या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ''फुलेराच्या राजकारणाच्या गढूळ पाण्यातून वावरताना, अभिषेक आपली निष्पक्षता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो.'' पंचायत सीझन 3'च्या फर्स्ट लूक पोस्टरमध्ये वेब सीरीजचे सर्व प्रमुख पात्रे दिसत आहेत. 'पंचायत सीझन 3' मध्ये जितेंद्र कुमार मुख्य भूमिकेत आहे, तर रघुबीर यादव, नीना गुप्ता, सान्विका, चंदन रॉय, दुर्गेश कुमार, अशोक पाठक, फैसल मलिक आणि सुनीता राजवार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

'पंचायत'चा तिसरा सीझन असणार जोरदार : 'पंचायत' वेब सीरीजमध्ये इंजिनीअरिंग पदवीधर विद्यार्थी अभिषेकचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. जो, चांगली नोकरी नसल्यामुळे, उत्तर प्रदेशातील फुलेरा या दुर्गम गावात पंचायत सचिव म्हणून रुजू होतो. 'पंचायत सीझन 3'ची रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही. मात्र आता 'पंचायत'चा तिसरा सीझन येत असल्यानं अनेकजण खुश आहेत. प्राइम व्हिडिओनं शेअर केलेल्या या पोस्टवर एका चाहत्यानं लिहिलं, ''पंचायत'चा तिसरा सीझन पाहण्यासाठी मी खूप आतुर आहे.'' दुसऱ्या एकानं लिहिलं, ''पंचायत' तिसरा सीझन कधी रिलीज होईल आता मी वाट पाहत आहे.'' आणखी एकानं लिहिल, 'पंचायत'च्या प्रत्येक सीझनमध्ये काहीतरी सुंदर पाहिला मिळते.'' अशा अनेक कमेंट्स या पोस्टवर येत आहेत. याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

हेही वाचा :

  1. Ananya Panday : अनन्या पांडेचा पाहायला मिळणार एक अनोखा संघर्षमय प्रवास, 'कॉल मी बे'चा फर्स्ट लूक रिलीज
  2. S S Rajamouli : एस.एस.राजामौली यांनी जपानच्या 'आरआरआर' स्क्रिनिंगमध्ये केली सीक्केलची पुष्टी
  3. पुलकित सम्राटची पत्नी क्रिती खरबंदानं 'पहिल्या रसोई'चे फोटो केले शेअर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.