ETV Bharat / entertainment

S S Rajamouli : एस.एस.राजामौली यांनी जपानच्या 'आरआरआर' स्क्रिनिंगमध्ये केली सीक्केलची पुष्टी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 19, 2024, 5:22 PM IST

S S Rajamouli : एस. एस .राजामौली यांनी जपानमधील स्क्रिनिंगमध्ये 'आरआरआर'चा सीक्केल बनवला जाणार असल्याचं म्हटलं आहे. आता यानंतर चाहते 'आरआरआर 2'साठी खूप उत्सुक आहेत.

S S Rajamouli
एस. एस .राजामौली

मुंबई - S S Rajamouli : भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शकांपैकी एक असलेले एस. एस. राजामौली यांनी आज आनंदाची बातमी दिली आहे. राजामौली यांच्या 'आरआरआर' चित्रपटानं जगात खळबळ माजवली होती. आता 'आरआरआर'चा सीक्केल येणार असल्याचं समजत आहे. राजामौली सध्या जपानमध्ये आहेत आणि त्यांचा 'आरआरआर' चित्रपट तेथे प्रदर्शित होत आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी 'आरआरआर 2' हा लवकरच येणार असल्याचं म्हटलं आहे. राजामौली यांचा 'आरआरआर' चित्रपट 5 मार्च 2022 रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज झाला होता. हा चित्रपट अनेकांना प्रचंड आवडला होता. 'आरआरआर' चित्रपटाची आता देखील जादू कायम आहे.

'आरआरआर' चित्रपट : राजामौली यांच्या 'आरआरआर' चित्रपटानं जगभरात 1200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. आता 'आरआरआर' जपानमध्येही धूम करत आहे. राजामौली यांनी आपल्या पत्नीसह जपानमध्ये 'आरआरआर'च्या स्क्रीनिंगला हजेरी लावली. राजामौली यांनी जपानी प्रेक्षकांनी भरलेल्या थिएटरमध्ये त्यांचा चित्रपट पाहिला. जपानमधील स्क्रिनिंगचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि चाहते आता 'आरआरआर'च्या सीक्केलची वाट पाहत आहेत. 95 व्या ऑस्करमध्ये, राम चरण आणि जूनियर एनटीआर स्टारर 'आरआरआर'मधील नाटू नाटू गाण्याला ऑस्कर अवार्ड मिळाला आहे.

राजामौली जपानी महिलेल्या भेटले : दरम्यान दुसरीकडे, राजामौली हे एका जपानी महिला चाहत्यालाही भेटले. राजामौली यांनी त्यांच्या चाहत्यांबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. ही जपानी महिला 83 वर्षांची आहे आणि तिला रोज नाटू-नाटूवर डान्स करायला आवडते. राजामौली आणि त्यांच्या पत्नीनं या महिला चाहत्याबरोबरचे फोटो क्लिक केले आहेत. आता या फोटोच्या कमेंट्स विभागात अनेकजण राजामौली आणि त्याच्या 'आरआरआर' चित्रपटाचे कौतुक करत आहे. दरम्यान 'आरआरआर' चित्रपटात राम चरण आणि जूनियर एनटीआर व्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट , श्रिया सरन, ऑलिव्हिया मॉरिस, अजय देवगण आणि इतर कलाकार होते. 'आरआरआर' चित्रपटामधील नाटू नाटू गाणं प्रचंड गाजलं होतं.

हेही वाचा :

  1. Citadel: Honey Bunny : वरुण धवन आणि समंथा रुथ प्रभू स्टार वेब सिरीजचे शीर्षक असेल 'सिटाडेल : हनी बनी' !
  2. ऐश्वर्या राय बच्चननं आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त शेअर केली भावनिक पोस्ट
  3. Priyanka Chopra : प्रियांका चोप्रानं निक जोनास आणि मालतीबरोबरचे दुबई व्हॅकेशन फोटो आणि व्हिडिओ केले शेअर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.