ETV Bharat / entertainment

एसएस राजामौली दिग्दर्शित 'SSMB29' चित्रपटाच्या अपडेटसाठी चाहते आतुर - SSMB29

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 3, 2024, 2:30 PM IST

SS Rajamouli and Mahesh Babu
एसएस राजामौली आणि महेश बाबू(Social media)

'कृष्णम्मा' या तेलुगू चित्रपटाच्या प्री-रिलीझ इव्हेंटमध्ये एसएस राजामौली, शिवा कोरटाला आणि अनिल रविपुडी एकाच मंचावर एकत्र आले होते. यानिमित्तानं महेश बाबूची भूमिका असलेल्या राजामौली दिग्दर्शित 'SSMB29' चित्रपटाची चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे.

मुंबई - ब्लॉकबस्टर 'आरआरआर' चित्रपटाच्या उत्तुंग यशानंतर, एसएस राजामौली तेलगू सुपरस्टार महेश बाबूच्या बरोबर त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी काम करत आहे. साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठे स्टार जेव्हा चित्रपट निर्मितीला सुरुवात करतात तेव्हा त्याचे शीर्षक बऱ्याचदा ठरलेलं नसतं. तेव्हा त्या नायकाच्या नावाच्या एनिशियल्सचा वापर तात्पुरते शीर्षक म्हणून केले जाते. उदाहरणार्थ 'आरआरआर' या चित्रपटाचं शूटिंग तात्पुरते शीर्षक म्हणून झाले. या चित्रपटात रामचरण होता म्हणून त्याच्या नावातील एक 'आर', दिग्दर्शन राजामौली करत होते म्हणून त्याच्या नावातला दुसरा 'आर' आणि ज्युनियर एनटीआर ( नंदमुरी तारका रामा राव ) च्या नावातील एक 'आर' असे 'आरआरआर' हे शीर्षक बनले. बराच काळ झाल्यानंतर दुसरं कथेला योग्य शीर्षक सूचले नाही. मग याच 'आरआरआर' शीर्षकाच्या अक्षरांचा फुलफॉर्म बनवण्यात आला आणि तेलुगुमध्ये 'रौद्रम रानम रुधीरम' असं शीर्षक तयार झालं. हा चित्रपट तेलुगु शिवाय इतर भाषेतही बनवण्यात आल्यामुळे या शीर्षकाचा फुलफॉर्म 'राईज रोअर रिव्होल्ट' असा करण्यात आला.

तात्पुरत्या शीर्षकाबद्दल इतकं सर्व सांगण्यामागचा हेतू हा आहे की एसएस राजामौली आणि महेशबाबू यांच्या आगामी चित्रपटाचं शीर्षक या दोघांच्याच नावाच्या एनिशिएल्सवरुन तयार झालंय. हे शीर्षक आहे 'SSMB29' ! अर्थातच एसएस राजामौली आणि महेशबाबू यांच्या जोडीचा चित्रपट व महेश बाबूचा 29 वा चित्रपट!! महेश बाबूचे चाहते 'SSMB29' वरील अपडेट्सची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि इंडस्ट्रीमध्येही एक उत्सुकता निर्माण झालं आहे.

1 मे रोजी सत्यदेवची भूमिका असलेला आगामी चित्रपट 'कृष्णम्मा'च्या प्री-रिलीज इव्हेंटच्या प्रसंगी तीन चित्रपट निर्माते शिवा कोरटाला, एसएस राजामौली आणि अनिल रविपुडी एकाच मंचावर एकत्र आले होते. इव्हेंटचा एक व्हिडिओ आता ट्विटरवर व्हायरल झाला आहे. यामध्ये राजामौली आणि अनिल यांच्यातील गमतीशीर भांडण व्हिडिओत कॅप्चर झालं आहे. त्यामुळे 'SSMB29' चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी ताणली आहे.

दरम्यान, महेश बाबू 'SSMB29' ची तयारी करत आहे. त्याच्या नवीन लूक पाहून चाहत्यांनी चित्रपटाबद्दलचा अंदाज लावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट इंडियाना जोन्ससारखा जंगल साहसी असेल, ज्यामध्ये महेशचे पात्र भगवान हनुमानापासून प्रेरणा घेताना दिसणार आहे.

दुसरीकडे, ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर अभिनीत शिवा कोराटलाचा महत्त्वाकांक्षी 'देवरा' हा चित्रपट चर्चा निर्माण करत आहे. हे दोन चित्रपट 'आरआरआर' चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर ज्युनियर एनटीआरचे पुनरागमन दर्शवत आहेत. दोन्ही चित्रपटांचे चाहते याचे अपडेट आणि रिलीज तारखांची आतुरतेने वाट पाहत आहेत. यामुळे तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये उत्साह वाढला आहे.

हेही वाचा -

  1. एसएस राजामौलीचे ओटीटी पदार्पण : 'बाहुबली: क्राउन ऑफ ब्लड' सिरीजचा ट्रेलर आऊट - SS Rajamoulis OTT Debut
  2. अक्षय कुमार आणि अर्शद वारसी अभिनीत 'जॉली एलएलबी 3'ची शुटिंग सुरू - AKSHAY KUMAR AND ARSHAD WARSI
  3. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'क्रिश 4'; सिद्धार्थ आनंद यांनी सांगितलं, 'हो... तो येतोय' - Krrish 4
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.