ETV Bharat / entertainment

कान्सच्या रेड कार्पेट पदार्पण करण्यापूर्वी थाय हाय स्लिट गाऊनमध्ये झळकली कियारा अडवाणी - Cannes Film Festival 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 18, 2024, 11:04 AM IST

Cannes Film Festival 2024: कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये तिच्या रेड कार्पेट पदार्पणापूर्वी कियारा अडवाणीनं चाहत्यांना मोहित केलं आहे. प्रबल गुरुंगच्या डिझाइनमध्ये फ्रेंच रिवेरामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

Kiara Advani
कियारा अडवाणी ((ANI))

मुंबई - Cannes Film Festival 2024: जगातील प्रतिष्ठीत 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 च्या फ्रेंच रिवेरामध्ये कियारा अडवाणीनं सुंदर प्रबल गुरुंग गाऊन आणि अनोख्या मोत्याच्या कानातल्यांसह सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आपल्या ग्रेस आणि स्टाईलमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या कियारानं कान्समध्ये रेड सी फिल्म फाउंडेशनच्या वुमन इन सिनेमा गाला डिनरला हजेरी लावली. या महोत्सवातील उत्सवाचा भर जसा वाढत जातो तसे नवीन सेलिब्रिटी फॅशन स्टेटमेंट्स पाहण्यासाठी सोशल मीडियाची उत्सुकता वाढत आहे आणि यामध्ये कियारानं तिच्या चाहत्यांना निराश केलं नाही.

ऐश्वर्या राय बच्चन रेड कार्पेटवर चमकत असताना, कियारा अडवाणीनंही आत्मविश्वास आणि अभिजातपणा दाखवत एका वेगळ्या कार्यक्रमात कान्सच्या रेड कार्पेटवर पदार्पण केलं. तिच्या निखळ फॅशन निवडीसाठी ओळखली जाणारी,कियारा सहजतेनं पारंपारिक आणि आधुनिक स्टाईलचं सुरेख मिश्रण करत, नेहमी आपल्या जादुई सौंदर्याची छाप सोडत असते.

कान्स पदार्पणासाठी कियाराने प्रबल गुरुंगचा एक मोहून टाकणारा पांढरा गाऊन निवडला होता. या गाऊनमध्ये प्लंगिंग नेकलाइन, व्हॉल्युमिनस स्लीव्हज आणि थाय हाय स्लिट यासारखे डिझाइन घटक आहेत. तिच्या अ‍ॅक्सेसरीज, वेगळ्या धाडणीचे मोत्याचे कानातले आणि स्टेटमेंट रिंगमुळे तिच्या नैसर्गिक सौंदर्यात भर पडली.

लक्ष्मी लेहरनं स्टाईलबद्ध केलेल्या कियाराने तिचा लुक आयकॉनिक ख्रिश्चन लुबाउटिन हिल्स आणि सूक्ष्म तरीही मोहक मेकअपने पूर्ण केला. स्मोकी डोळे, लालसर गाल आणि न्यूड लिप ग्लोससह तिनं आपलं सौंदर्य खुलवलं.

तिनं आपले केस, सैल कर्लमध्ये स्टाइल केले होते आणि हाफ-अप, हाफ-डाउन हेअरस्टाइल, तिच्या एकूण लुकचं आकर्षण वाढवणारी होती. कान्स 2024 मध्ये कियाराच्या हजेरीनं चाहत्यांना आणि फॅशन प्रेमींना आश्चर्यचकित केलं.

हेही वाचा -

  1. कान्स फेस्टिव्हल 2024 मध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने वेधलं लक्ष - Cannes Festival 2024
  2. कान्सच्या रेड कार्पेटवर दुसऱ्या दिवशी ग्लॅमरस स्टाईलमध्ये अवतरली ऐश्वर्या राय - CANNES FILM FESTIVAL 2024
  3. 'हे' पाच भयपट आणि वेब सीरीज पाहून तुम्हीही व्हाल थक्क... - five horror movies and web series

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.