ETV Bharat / entertainment

सलमान आणि अर्जुन कपूरचे संबंध ताणल्याची बोनी कपूरनं दिली कबुली - Boney Kapoor

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 2, 2024, 3:59 PM IST

Updated : Apr 2, 2024, 4:37 PM IST

बोनी कपूर निर्मित अजय देवगण स्टारर 'मैदान' रिलीजसाठी सज्ज आहे. प्रमोशन दरम्यान अर्जुन आणि सलमान खानच्या नात्यात तणाव असल्याची कबूली बोनी कपूर यांनी दिलीय. मात्र, सलमानमुळेच अर्जुन अभिनयात येऊ शकल्याचाही खुलासा यावेळी त्यांनी केला.

Boney Kapoor
बोनी, अर्जुन आणि सलमान

मुंबई - बोनी कपूर निर्माण करत असलेल्या अजय देवगण स्टारर 'मैदान' चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज होत आहे. या दरम्यान बोनी कपूर यांनी त्यांचा मुलगा अर्जुन कपूर आणि सलमान खान यांच्यात वाढत गेलेल्या तणावाच्या नात्याबद्दल चर्चा केली. 'मैदान' चित्रपटाच्या प्रमोशन मुलाखतीदरम्यान बोनी यांनी खुलासा केला की सलमान आणि अर्जुनच्या बदललेल्या समीकरणामुळे त्याच्या सलमान बरोबरच्या नात्यात काहीच फरक पडला नाही. त्यांचे संबंध पूर्वी होते तसेच असल्याचंही बोनीनं सांगितलं.

एका डिजिटल प्लॅटफॉर्मला दिलेल्या मुलाखतीत बोनी यांनी अर्जुन आणि सलमान यांच्यात तणावाचं नातं निर्माण झाल्याची कबुली दिली. सलमानचा भाऊ अरबाज खानची पत्नी मलायका अरोराशी अर्जुन कपूरचे संबंध आहेत. सध्या तिचा अरबाजशी घटस्फोट झाला असला तरी त्यांच्या या नात्यानं सलमान दुखावला गेला. शिवाय सलमानची बहिण अर्पिता खानशी अर्जुन कपूरचे संबंध असल्याचा पूर्वी चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्यांचाही 2005 मध्ये ब्रेकअप झाला. नंतरच्या काळात अर्पिता आणि आयुष शर्मा यांचे प्रेम जुळले आणि दोघांनी लग्न केलं. आता ते दोन मुलांचे पालक आहेत.

बोनी कपूर यांनी आपल्या मुलाखतीत सलमानबरोबर असलेलं त्याचं नातं कायम असल्याचं सांगितलं. अर्जुनच्या कारकिर्दीचा जेव्हा प्रश्न निर्माण झाला होता तेव्हा त्याला मदत करणारा सलमान खानच होता हे त्यांनी आवर्जून सांगितलं. सलमान खानमुळेच अर्जुन कपूर अभिनय करु शकला आणि त्याला आपल्या कारकिर्दीत यशस्वी होण्यासाठीचा सूर सापडल्याचं बोनी कपूरने कृतज्ञतापूर्वक सांगितलं.

सलमानबद्दल बोलताना बोनी कपूर म्हणाले, " आई मोना कपूरला (बोनी कपूरची पहिली पत्नी) गमावल्यानंतर अर्जुन पुन्हा अभिनय करु शकेल, असं मला वाटत नव्हतं. सलमाननेच मला फोन करून सांगितलं की, ‘बोनी सर, तो अभिनेता होऊ शकेल. त्याच्यात ती क्षमता आहे.’ तो अभिनेता होईल याची जबाबदारीही सलमाननंच घेतली होती."

अर्जुन आणि सलमान यांच्यातील ताणलेल्या संबंधांमुळे त्याच्या स्वतःच्या नातेसंबंधावर परिणाम झाला का, असे विचारले असता बोनी म्हणाले, "सलमान बरोबरचे माझे समीकरण बदलले नाही. मी अजूनही त्याच्यावर प्रेम करतो, मला अजूनही वाटतं की त्याच्यासारखे फार कमी लोक आहेत. तो मोठ्या आणि प्रेमळ मनाचा आहे, प्रत्येकवेळी तो मला प्रेमानं भेटतो. तो मला खूप आदराने वागवतो आणि मी त्याच्यावर प्रेम करतो."

हेही वाचा -

प्रियांका चोप्रासह निक जोनास लॉस एंजेलिसला परतले, फोटो केले शेअर - Nick and Priyanka

'सिंघम'चा आज वाढदिवस, अजय देवगणचे 'हे' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार - Ajay Devgan birthday

'मजा संपली काम सुरू', कार्तिक आर्यन स्टारर 'भूल भुलैया 3'च्या दुसऱ्या शेड्यूलचे शूटिंग सुरू - bhool bhulaiyaa 3

Last Updated : Apr 2, 2024, 4:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.