ETV Bharat / entertainment

प्रियांका चोप्रासह निक जोनास लॉस एंजेलिसला परतले, फोटो केले शेअर - Nick and Priyanka

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 2, 2024, 11:48 AM IST

Updated : Apr 2, 2024, 11:56 AM IST

Nick and Priyanka : प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे आता लॉसएंजेलिसला परतले आहेत. आता निकने काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो आपल्या कुटुंबासह दिसत आहे.

Nick and Priyanka
निक आणि प्रियांका

मुंबई - Nick and Priyanka : ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास हे नेहमीच चर्चेत असतात. या जोडप्यानं मुलगी मालती मेरीबरोबर भारतात चांगला वेळ घालवला. त्यांनी भारतात होळी देखील साजरी केली. आता हे जोडपे लॉस एंजेलिसला परतले आहे. निक जोनासनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. त्यानं शेअर केलेले फोटो अनेकांना आवडत आहेत. या फोटोच्या कमेंट्स विभागात अनेकजण कमेंट्स करून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अलीकडेच प्रियांकानं सोशल मीडियावर काही सुंदर फोटो शेअर केली आहेत, जी खूप आकर्षक आहेत. याशिवाय तिनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये निक आपल्या मुलीबरोबर फिरताना दिसत आहे.

निक जोनासचं लूक : छोट्या व्हिडिओ क्लिपमध्ये, निक हा स्टायलिश आय वेअरसह पांढरा स्वेटशर्टवर आहे. याशिवाय मालती स्ट्रोलरमध्ये बसून असून शहराच्या दृश्याचा आनंद घेत आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांका चुलत बहीण मन्नारा चोप्राबरोबर तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत दिसली होती. या वाढदिवसामध्ये तिनं आपल्या कुटुंबाबरोबर अनेक फोटो क्लिक केले होते. प्रियांका आणि निक अनेकदा आपल्या सोशल मीडियावर सुंदर सुंदर फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. हे जोडपे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. प्रियांकाचे इन्स्टाग्रामवर 91 मिलियन फॉलोअर्स आहेत.

प्रियांका चोप्राचे वर्कफ्रंट : प्रियांका आणि निकनं बरेचं दिवस भारतात मुक्कामी होते. यादरम्यान हे जोडपे अयोध्येत श्रीराम मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी प्रियांकाची आई मधू चोप्रा देखील तिच्याबरोबर होती. तसेच यानंतर तिनं मुंबईतील प्राइम व्हिडिओच्या इव्हेंटमध्ये देखील हजेरी लावली होती. दरम्यान प्रियांकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी 'लव्ह अगेन' आणि 'सिटाडेल'मध्ये दिसली होती. याशिवाय ती 'हेड्स ऑफ स्टेट'चा एक भाग आहे. बॉलिवूडमध्ये प्रियांका दिग्दर्शक फरहान अख्तरच्या 'जी ले जरा ' या चित्रपटामध्ये झळकेल. तसेच ती कल्पना चावला बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. 'मजा संपली काम सुरू', कार्तिक आर्यन स्टारर 'भूल भुलैया 3'च्या दुसऱ्या शेड्यूलचे शूटिंग सुरू - bhool bhulaiyaa 3
  2. अल्लू अर्जुन आणि ॲटलीच्या आगामी प्रोजेक्टमध्ये त्रिशा कृष्णनची झाली एंट्री - allu arjun
  3. उर्फी जावेद स्टारर 'लव्ह सेक्स और धोखा 2'चा टीझर प्रदर्शित - love sex aur dhokha 2 teaser
Last Updated :Apr 2, 2024, 11:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.