ETV Bharat / entertainment

अजय देवगणनं 'मैदान'च्या रिलीजपूर्वी घेतला क्रिकेटचा आनंद , फोटो व्हायरल - maidaan Movie

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 6, 2024, 11:41 AM IST

Ajay Devgan : अभिनेता अजय देवगण स्टारर 'मैदान' हा चित्रपट 10 एप्रिल रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. आता रिलीजपूर्वी अजयनं क्रिकेटचा आनंद घेतला आहे.

Ajay Devgan
अजय देवगण

मुंबई - Ajay Devgan : हिंदी चित्रपटसृष्टीचा 'सिंघम' अजय देवगण त्याच्या आगामी स्पोर्ट्स बायोपिक 'मैदान'मुळे चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होण्यासाठी फक्त 4 दिवस उरले आहेत. या चित्रपटात अजय देवगण भारतीय फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीमच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय स्पोर्ट्स बायोपिकमध्ये काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान अजयनं फुटबॉल सोडून क्रिकेटमध्ये हात आजमावला आहे. अजय देवगणनं त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तो क्रिकेट खेळताना दिसत आहे. ही पोस्ट शेअर करताना अजयनं लिहिलं, ''आज वेगळ्या मैदानावर पण जोश बदलला नाही.''

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

अजय 'मैदान' रिलीजपूर्वी खेळला क्रिकेट : शेअर केलेल्या फोटोमध्ये अजयबरोबर माजी क्रिकेटर हरभजन सिंग देखील क्रिकेट खेळताना दिसत आहे. दरम्यान अजयच्या डॅशिंग लूकबद्दल बोलायचं झालं तर, त्यानं काळ्या पॅन्टसह पांढऱ्या टी-शर्टवर ऑलिव्ह कलरचं जॅकेट परिधान केलं आहे. लूक आणखी सुंदर करण्यासाठी त्यानं सनग्लास लावला आहे. अजयचे चाहतेही या फोटोंवर सुंदर प्रतिक्रिया देऊन त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अजयच्या एका चाहत्यान या पोस्टवर लिहिलं, ''मी पहिल्याच दिवशी 'मैदान' चित्रपट पाहणार.'' दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, ''अजय सरांचं लूक खूप सुंदर आहे.'' आणखी एका चाहत्यांनं लिहिलं, ''फुटबॉल पण खेळायला पाहिजे.''

'मैदान' चित्रपटाबद्दल : अजय देवगण आणि साऊथ अभिनेत्री प्रियामणी स्टारर 'मैदान' चित्रपटाचे दिग्दर्शन अमित शर्मा यांनी केलं आहे. झी स्टुडिओ आणि बेव्ह्यू प्रोजेक्ट हा चित्रपट सादर करत आहेत. 'मैदान' चित्रपट येत्या ईदच्या मुहूर्तावर 10 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट देखील याच दिवशी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान अजयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 'सिंघम अगेन' , 'रेड 2' , 'गोलमाल 5' 'औरों में कहां दम था', आणि 'दे दे प्यार दे 2' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. 'द गोट लाइफ'ने ग्लोबल बॉक्स ऑफिसवर गाठला 100 कोटींचा टप्पा, जाणून घ्या 10व्या दिवसाची कमाई - THE GOAT LIFE
  2. 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या एका दिवसाच्या स्टंटचा खर्च होता 3-4 कोटी, दिग्दर्शकानं केला खुलासा - Bade Miyan Chote Miyan
  3. 'पुष्पा 2' मधील रश्मिका मंदान्नाचा 'श्रीवल्ली लूक' लॉन्च, निर्मात्यांनी चाहत्यांनी दिलं बर्थडे गिफ्ट - Srivalli first look
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.