ETV Bharat / entertainment

महागड्या 4 कोटीच्या कारमधून फिरल्यानंतर कार्तिक आर्यनने का केला सायकल चालवण्याचा विचार?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 16, 2024, 3:40 PM IST

अभिनेता कार्तिक आर्यनने अलिकडेच सुमारे 4.17 कोटी रुपयांची लक्झरी कार खरेदी केली होती. त्याच्या मालकीच्या कारच्या यादीत नवीन महागडी कार जोडली गेल्यानंतर कार्तिकने चाहत्यांना आश्चर्यचकित केले. शुटिंग सेटवर जाण्यासाठी सायकलला प्राधान्य देण्याचा विचार तो करत आहे.

Actor Karthik Aaryan
कार्तिक आर्यनने का केला सायकल चालवण्याचा विचार

मुंबई - बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या दिमतीला अनेक आलिशान गाड्या आहेत. अलिकडे त्याच्या या ताफ्यात रेंज रोव्हर SV ही 4.17 कोटी किंमतीची कार नव्याने सामील झाली आहे. त्याच्याकडे अशा लक्झरी कार असूनही, कार्तिकने स्वतःचा एक व्हिडिओ शेअर करून त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. यामध्ये तो सायकल चालवताना दिसत आहे. ठरलेल्या ठिकाणी जाण्यासाठी सायकलचा वापर करण्याबाबत त्याने विनोदाने आपले विचार मांडले आहेत.

शनिवारी इंस्टाग्रामवर कार्तिकने व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, "अब सोच रहा हूँ सेट पर भी सायकल से जाऊं." कार्तिकच्या या पोस्टला नेटिझन्सकडून मजेदार प्रतिसाद मिळाला. एकाने लिहिले, ''5 कोटीची कार असतानाही कार्तिकने सायकल चालवणार असल्याचा विनोद केला आहे.'' आणखी एका म्हटलंय, ''तर मग तुझी ती 6 कोटीची कार मला दे.'' तर अनेकांनी त्याच्या रेंज रोव्हर SV ला न्याय देण्याचा सल्ला दिला आहे. आणखी एकाने त्याला, ''जमीनीवर वावरणारा अभिनेता'' असल्याचं म्हणत 'रुह बाबा'वरचे प्रेम व्यक्त केलाय.

शुक्रवारी, कार्तिक इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला ज्यामध्ये तो आपल्या पाळीव श्वानासह त्याच्या नवीन रेंज रोव्हर एसव्ही बरोबर पोझ देताना दिसला आहे. अनौपचारिक पण आकर्षक पोशाख परिधान केलेल्या कार्तिकने त्याच्या वाहनांमध्ये नवीन कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत विनोदाच्या स्पर्शाने कॅप्शन दिलेल्या फोटोमध्ये आनंद व्यक्त केला.

त्याच्या नवीन कारच्या उत्साहात असलेला कार्तिक त्याच्या व्यावसायिक कमिटमेंट्सलाही समर्पित आहे. सध्या तो हॉरर कॉमेडी 'भूल भुलैया 3' च्या शुटिंमध्ये गुंतलेला आहे. कार्तिक आर्यनने अलीकडेच चित्रपटाच्या सेटवरून आपला एक झलक दाखवली होती. 2024 च्या दिवाळीला चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत असलेल्या चाहत्यांना सीन्सची तो तयारी कशी करत आहे याची झलक दाखवली होती.

अनीस बज्मी दिग्दर्शित, 'भूल भुलैया 3' मध्ये कार्तिक बरोबर विद्या बालन आणि तृप्ती दिमरी यांच्यासह स्टार-स्टडेड कलाकार आहेत. 'भूल भुलैया 3' व्यतिरिक्त, कार्तिकने अलीकडेच कबीर खान दिग्दर्शित 'चंदू चॅम्पियन' या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटाचे शुटिंग पूर्ण केले. एका धावपटूच्या प्रेरणादायी सत्यकथेवर आधारित हा चित्रपट 14 जून 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. अनीस बज्मी बरोबर कार्तिकचा हा पहिलाच चित्रपट आहे.

हेही वाचा -

  1. Fateh Teaser out : सोनू सूद स्टारर 'फतेह'चा थरारक टीझर रिलीज, पाहा व्हिडिओ
  2. Ranbir Kapoor outfit : आलिया भट्टच्या वाढदिवसाच्या प्रसंगी रणबीर कपूरच्या टी-शर्टनं घेतलं सर्वाचं लक्ष वेधून
  3. Madhubala biopic : मधुबालावरील बायोपिकची घोषणा, दिग्दर्शिका जसमीत के रीन करणार या चरित्रपटाचे दिग्दर्शन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.