ETV Bharat / bharat

लग्नात काम करणाऱ्या मुलीवर तंदूर बनवणाऱ्या मुलांचा बलात्कार; कसंबसं सुटका केली अन्....

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 3, 2024, 8:47 PM IST

Girl Gang Raped In Hathras : हाथरसमध्ये लग्नाच्या मिरवणुकीत फुलांचा वर्षाव करणाऱ्या मुलीवर दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार केलाय. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केलाय.

फाईल फोटो
फाईल फोटो

हाथरस Girl Gang Raped In Hathras : हाथरस जंक्शन कोतवाली भागातील एका गेस्ट हाऊसमध्ये आयोजित केलेल्या लग्न समारंभात फुलांचा वर्षाव करणाऱ्या एका मुलीवर तंदूर बनवणाऱ्या दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली आहे. तसंच, पोलिसांनी दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला आहे.

कसंबसं मुलगी त्यांच्या तावडीतून सुटली : शनिवारी (दि. 2 मार्च) रात्री कोतवाली हाथरस जंक्शन भागातील सलेमपूर येथील एका गेस्ट हाऊसमध्ये लग्न समारंभात फुलांचा वर्षाव करण्यासाठी ही मुलगी आली होती. त्यानंतर लग्नात तंदुरचे काम करणाऱ्या पुष्पेंद्र आणि सुमितने तिला घरी सोडण्याच्या बहाण्यानं दुचाकीवर नेलं. परंतु, वाटेत संधी शोधून दोघांनी शेतात तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. कसंबसं मुलीने घरी पोहोचून घरच्यांना या घटनेची माहिती दिली.

पीडितेवर वैद्यकीय उपचार सुरू : कुटुंबीयांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार नोंदवून मुलीची वैद्यकीय तपासणी केली आहे. पोलिसांनी आरोपी पुष्पेंद्र आणि सुमित विरोधात तक्रार नोंदवली आहे. हाथरस पोलीस स्टेशनचे प्रभारी विजय सिंह यांनी सांगितलं की, "या प्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्यानुसार पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. पीडितेवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. दोन्ही आरोपींना लवकरच अटक करून तुरुंगात पाठवलं जाईल."

कार्यक्रमातील सहभागी कामगारांची चौकशी : या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुटुबीयांनी तत्काळ पोलीस ठाणे गाठून आपल्या मुलीसोबत जे काही घडलं त्याबद्दल माहिती दिली. तसंच, मुलीच्या आरोग्याचा प्रश्न असल्यानं तिला उपचारांसाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता पोलिसांनी येथील कार्यक्रमात कामासाठी कोण मुलं आली होती? याबाबत तपास सुरु केला असून, त्याबाबत लवकरच माहिती दिली जाईल, असंही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा :

1 बिल्किस बानो प्रकरण : सुटका रद्द केल्यानं दोषींची सर्वोच्च न्यायालयात धाव

2 परदेशी महिलेवर सामूहिक बलात्कार, पतीसोबत बाईकवर गेली होती फिरायला

3 पतीने आत्महत्या केल्यानंतर पत्नीनेही दोन लहान मुलींसह संपवलं जीवन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.