ETV Bharat / bharat

पतीने आत्महत्या केल्यानंतर पत्नीनेही दोन लहान मुलींसह संपवलं जीवन

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 2, 2024, 7:46 PM IST

Updated : Mar 2, 2024, 7:52 PM IST

फाईल फोटो
फाईल फोटो

Suicide in Madurai : सततच्या आरोग्याच्या त्रासाल कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना आज शनिवार (दि. 2 मार्च) रोजी तामिळनाडुच्या मदुराईमधून समोर आली आहे. तसंच, या घटनेनंतर पत्नी आणि दोन्ही मुलींचाही जीव गमावल्याने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

मदुराई /तामिळनाडू : Suicide in Madurai : मदुराई येथून एक धक्कादायक बातमी समोर आली असून, सततच्या खराब प्रकृतीमुळे एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, हा धक्का सहन न झाल्याने त्याच्या पत्नीसह तिच्या दोन मुलींनीही आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. बिघडलेल्या प्रकृतीला कंटाळून एका व्यक्तीने वैगईत आत्महत्या केली. सेंथिलकुमार असं या व्यक्तीचं नाव आहे. अनुप्पनदी आंबेडकर नगर येथे ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच सिलिमन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तपासादरम्यान, पोलिसांना सेंथिलकुमारने लिहिलेलं एक पत्र सापडलं, ज्यामध्ये त्याने 'सतत खराब प्रकृतीमुळे आपण आपलं जीवन संपवत आहोत' असं लिहिलं आहे.

मदुराईमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत : पोलिसांनी मृत सेंथिलकुमारची पत्नी वीरा सेल्वीला पतीच्या मृत्यूची माहिती दिली. तेव्हा वीरा सेल्वी यांना या घटनेचा मोठा धक्का बसला. त्यानंतर त्या काही वेळातच अचानक बेशुद्ध पडल्या. दरम्यान, पतीच्या मृत्यूच्या बातमीने पत्नीवर मोठा आघात झाल्याचं येथे पाहायला मिळालं. त्यानंतर काही वेळाने स्वतःसह तिने दोन मुलींनाही संपवलं. सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे त्या दोन्ही मुली खूप लहान होत्या. वीरा सेल्वी या सरकारी वेदशाळा, मदुराईमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.

दोन लहान मुलींनाही यामध्ये जीव गमवावा लागला : एका महिलेसह दोन मुलींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच थेप्पाकुलम पोलिसांनी घटनास्थळ गाठून वीरा सेल्वी आणि तिच्या दोन मुलींचे मृतदेह बाहेर काढलं. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेनंतर येथील परिसरात मोठ्या प्रमणात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसंच, दोन लहान मुलींनाही यामध्ये जीव गमवावा लागल्यानं सर्वत्र दु:खाचं वातावरण आहे.

हेही वाचा :

1 कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक आरोप! भाजपाकडून काँग्रेस आमदारांना 50 कोटींची ऑफर दिल्याचा दावा

2 राहुल गांधी यांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी प्रकरण, नाशिकमधून एक माथेफिरू ताब्यात

3 लोकसभा निवडणुकीपूर्वी गौतमनं घेतला 'गंभीर' निर्णय; सोशल मीडियावर केली घोषणा

Last Updated :Mar 2, 2024, 7:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.