ETV Bharat / bharat

अरुणाचल-सिक्कीम विधानसभा निवडणुक निकालाची तारीख बदलली, निवडणूक आयोगानं का घेतला निर्णय?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 17, 2024, 10:16 PM IST

Lok Sabha Elections 2024 : अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील विधानसभा निवडणुकांचे निकाल 2 जून रोजी येतील. याचे कारणही निवडणूक आयोगानं दिलं आहे. विधानसभेचा कार्यकाळ 2 जून रोजी संपत आहे.

Lok Sabha Elections 2024
Lok Sabha Elections 2024

मुंबई Lok Sabha Elections 2024 : अरुणाचल प्रदेश तसंच सिक्कीम विधानसभा निवडणुकीचे निकाल 4 जून ऐवजी 2 जूनला येतील. वास्तविक, दोन्ही राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ 2 जून रोजी संपत आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत 2 जूनपर्यंत मतमोजणी पूर्ण करावी लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन निवडणूक आयोगानं मतमोजणीसाठी 4 जून या तारखेत बदल केला आहे. आता 2 जून रोजी निकाल लागणार आहे.

अरुणाचल प्रदेशमध्ये 19 एप्रिलला मतदान : अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभा तसंच विधानसभा निवडणुकीसाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार, विधानसभा निवडणुकीची अधिसूचना 20 मार्च रोजी जारी केली जाईल, त्यानंतर नामांकन प्रक्रिया सुरू होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 27 मार्च असून, 28 मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 30 मार्च आहे.

लोकसभासह विधानसभेच्या निवडणुका एकाचवेळी : अरुणाचलमधील दोन लोकसभा तसंच 60 विधानसभा जागांसाठी 4 जून रोजी मतमोजणी होणार होती. अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभेच्या दोन तसंच विधानसभेच्या 60 जागा आहेत. राज्यातील विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ 2 जून रोजी संपत आहे. गेल्या निवडणुकीत भाजपानं राज्यातील दोन्ही लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या. विधानसभेत भाजपानं 41 जागा जिंकल्या, तर जनता दल (युनायटेड) सात, एनपीपी पाच तसंच काँग्रेसनं चार जागा जिंकल्या होत्या. दरम्यान, पीपीएनं एक जागा जिंकली, तर दोन अपक्ष उमेदवारही विजयी झाले होते.

सिक्कीमची काय आहे राजकीय स्थिती? : त्याचप्रमाणं सिक्कीममध्ये 19 एप्रिल रोजी लोकसभेसह विधानसभा निवडणुका एकाच वेळी होणार आहेत. या सिक्कीमध्ये लोकसभेची एकच जागा असून विधानसभेच्या 32 जागा आहेत. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, 20 मार्च रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी केली जाईल, त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 27 मार्च असून, 28 मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागं घेण्याची अंतिम तारीख 30 मार्च असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. निवडणुकीत सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा (SKM) चा सामना सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट (SDF) सोबत होणार आहे.

हे वाचलंत :

  1. Amsha Padvi : ठाकरेंना मोठा धक्का; आमदार आमश्या पाडवी यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
  2. Nyay Sankalp Padyatra : मुंबईत काँग्रेसची 'न्याय संकल्प पदयात्रा', यात्रेत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी सहभागी
  3. Uddhav Thackeray : गाफील राहू नका, २० मे रोजी या सरकारचे बारा वाजवा- उद्धव ठाकरे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.