ETV Bharat / bharat

महाराष्ट्र एकीकरण समिती निवडणुकीच्या मैदानात; निरंजन सरदेसाईंनी कारवारमधून थोपटले 'दंड' - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 10, 2024, 10:01 AM IST

Updated : Apr 10, 2024, 2:26 PM IST

Lok Sabha Election 2024
निरंजन सरदेसाई

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्र कर्नाटक सीमावद गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. हा वाद सोडवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती लढा देत आहे. मात्र त्यात यश आलं नाही. आता समितीनं लोकसभेत आपला उमेदवार उभा करण्याचं ठरवलं आहे.

महाराष्ट्र एकीकरण समिती निवडणुकीच्या मैदानात; निरंजन सरदेसाईंनी कारवारमधून थोपटले 'दंड'

कोल्हापूर Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकांचा आवाज बुलंद करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती लोकसभा निवडणुकीत उतरणार आहे. बेळगाव आणि कारवार या लोकसभा मतदारसंघात समिती आपला उमेदवार देणार आहे. कारवार लोकसभा मतदारसंघातून एकीकरण समितीचे निरंजन सरदेसाई यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावणार आहेत. "यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मराठी भाषिकांच्या मताधिक्यावर विजयी होणार," असा विश्वास निरंजन सरदेसाई यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रलंबित : गेली 67 वर्ष महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रलंबित आहे. या सीमावादाचा खटला अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यानं मराठी भाषिकांवर कानडी सरकारकडून होणारा अन्याय दूर झालेला नाही. एकेकाळी बेळगावसह सीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीचा दबदबा असताना गेल्या काही दिवसात बेळगाव महानगरपालिका, लोकसभा पोटनिवडणूक यामध्ये एकीकरण समितीला म्हणावं तसं यश मिळवता आलं नाही. मात्र आता एकीकरण समितीची सूत्र तिसऱ्या पिढीकडं गेली आहेत. यामधूनच बेळगाव आणि कारवार या दोन लोकसभा जागा लढवण्याचा निर्णय एकीकरण समितीनं घेतला आहे. यातील कारवार जागेवर एकीकरण समितीचे माजी आमदार निळकंठ सरदेसाई यांचे पुतणे आणि खानापूर तालुका एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. "कारवार लोकसभा मतदारसंघात असलेल्या 4 लाख मराठी भाषिकांच्या मतांवर देशाच्या सर्वोच्च सभागृहात मराठी भाषिकांच्या व्यथा मांडता येतील, असा विश्वास निरंजन सरदेसाई यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला.

अशी आहे कारवार लोकसभेची रचना : उत्तर कर्नाटकात येणाऱ्या कारवार लोकसभा मतदारसंघाची लोकसंख्या 14 लाखांच्या घरात आहे. या लोकसभा मतदारसंघात आठ विधानसभा मतदारसंघ येतात. खानापूर, कित्तूर, हलीयाल कारवार, कुमटा, भटकळ, सिरसी, एलापूर, या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यापैकी पाच विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचे आमदार आहेत. तर तीन जागेवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले. उत्तर कन्नडा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या लोकसभा मतदारसंघात मराठी भाषिकांच्या मतावर यापूर्वी महाराष्ट्र एकीकरण समितीनं आपले उमेदवार विधानसभेत विजयी केले. तरी यंदा लोकसभा निवडणुकीत निरंजन सरदेसाई मराठी भाषिकांचा आवाज बनून लोकसभेत जातात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सरदेसाई यांच्यापुढं भाजपाचे उमेदवार विश्वनाथ कागिरे हेगडे आणि काँग्रेसकडून तिकीट मिळालेल्या अॅड. अंजली निंबाळकर यांचे कडवं आव्हान असणार आहे.

हेही वाचा :

  1. Border Dispute : महाराष्ट्र कर्नाटक वाद चिघळला; सीमा भागात तणाव राजकीय पक्षांची टीका जशास तसे उत्तर देण्याचा इशारा
  2. Aditya Thackeray Agitation : आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन; सीमाप्रश्नी ठराव मांडण्याची मागणी
Last Updated :Apr 10, 2024, 2:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.