ETV Bharat / bharat

काश्मीरमध्ये जी दगडफेक केली त्याच दगडांनी विकसित जम्मू-काश्मीरची उभारणी करतोय - पंतप्रधान मोदी - Lok Sabha Election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 6, 2024, 9:12 PM IST

पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे आज शनिवार दि. 6 एप्रिल रोजी एका निवडणूक सभेला संबोधित केलं. यामध्ये ते म्हणाले, जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवणं हे आमचं ध्येय होतं आणि हे ध्येय पूर्णही झालं आहे. त्यानंतर काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांनी (Saharanpur Uttar Pradesh) फेकलेले दगड होते त्यानेच मोदी विकसित जम्मू-काश्मीरची उभारणी करत आहेत, असं मत पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केलं.

सहारनपूर : Lok Sabha Election 2024 : भारताला मजबूत देश बनवणं ही भाजपाची वचनबद्धता आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. भाजपाच्या हेतूनुसार, निष्ठेनुसार धोरणंही तशीच बनवली जातात. त्यामुळेच आज प्रत्येक भारतीय अनुभवातून सांगत आहे की, हेतू बरोबर असतील तर परिणाम योग्यच असतात. तसंच, भाजपा सरकार भेदभाव न करता काम करतं. शासनाच्या योजना प्रत्येक वर्ग, प्रत्येक जाती, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, हा आमचा विचार आहे. त्यामुळे भाजपा सरकारने 10 वर्षे पूर्ण ताकदीने काम केलं आहे. (Lok Sabha election) भाजपा देशातील प्रत्येक नागरिकाच्या समस्या कमी करत आहे. प्रत्येकासाठी नवीन संधी निर्माण करणं हे आपलं काम असल्याचं मोदी म्हणाले. सहारनपूरचे लाकूड कोरीव काम आणि तेथील लोकांचे कौशल्य दूरवर प्रसिद्ध आहे. त्यामुळे योगी असो वा मोदी, आम्हाला तुमची काळजी आहे. म्हणूनच आम्ही दोघंही एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतो 'व्होकल फॉर लोकल' असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणालेत.

'मेहनतीत कोणतीही कसर ठेवली नाही' : "10 वर्षांपूर्वी मी सहारनपूरला निवडणूक रॅलीसाठी आलो होतो. त्यावेळी देश प्रचंड निराशेच्या आणि संकटाच्या काळातून जात होता. तेव्हा मी तुम्हाला हमी दिली होती की, मी देश झुकू देणार नाही, देश थांबू देणार नाही. मी संकल्प केला होता की तुमच्या आशीर्वादाने मी प्रत्येक परिस्थिती बदलेन, निराशेला आशेत बदलेन. तुम्ही तुमच्या आशीर्वादात कोणतीही कसर ठेवली नाही आणि मोदींनी त्यांच्या मेहनतीत कोणतीही कसर ठेवली नाही असा दावाही मोदींनी यावेळी उपस्थितांसमोर केला आहे.

शक्ती कोणी संपवू शकेल का : शक्तीशी लढण्याच्या वक्तव्यावरून विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले, आमचं हे स्थान मातृशक्तीचं स्थान आहे. आमचं हे स्थान मातृशक्तीचं पूजन आहे आणि भारताच्या कानाकोपऱ्यात शक्तीची उपासना ही आमची नैसर्गिक गोष्ट आहे. आध्यात्मिक प्रवासाचा एक भाग आहे. आपण तो देश आहोत जो शक्तीपूजेला कधीही नाकारत नाही. पण इंडी अलायन्सचे लोक आपला लढा शक्तीविरुद्ध असल्याचं उघड आव्हान देत आहेत, हे देशाचं दुर्दैव आहे. शक्ती कोणी संपवू शकेल का? ताकदवानांना कोणी आव्हान देऊ शकेल का? ज्यांनी शक्ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला त्या सर्वांच्या नशिबी इतिहासात आणि पुराणात नोंद आहे असंही मोदी यावेळी मोदी म्हणाले.

हेही वाचा :

1 'आमचे दरवाजे खुले तसे कारागृहाचे दरवाजेही खुले'; पक्षांतराचा 'आठवले स्टाईल फंडा' - Ramdas Athawale On ED Raids

2 भीमा कोरेगाव प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाचा नागपूर विद्यापीठाच्या माजी प्राध्यापिका शोमा सेन यांना जामीन - Bhima Koregaon Violence Case

3 तालिबानपेक्षाही भयंकर! पंजाबमध्ये महिलेला विवस्त्र करत काढली धिंड, काय आहे संपूर्ण प्रकरण - NAKED PARADE women punjab

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.