ETV Bharat / bharat

दिल्लीतील साठ शाळांना बॉम्बनं उडवण्याची धमकी; विद्यार्थ्यांमध्ये दहशत - BOMB THREAT IN DPS SCHOOL

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 1, 2024, 12:11 PM IST

BOMB THREAT IN DPS SCHOOL
BOMB THREAT IN DPS SCHOOL

BOMB THREAT IN DPS SCHOOL: दिल्लीतील साठ शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे. पोलीस बॉम्ब शोधक पथकासह शाळेतील खोली न खोलीत शोध घेत आहेत.

दिल्लीतील साठ शाळांना बॉम्बनं उडवण्याची धमकी; विद्यार्थ्यांमध्ये दहशत

नवी दिल्ली BOMB THREAT IN DPS SCHOOL: राजधानीतील साठ शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीनं दिल्लीतील नागरिकांना चांगलाच हादरा बसला आहे. एका मेल आयडीवरुन साठ शाळांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची ही धमकी देण्यात आली आहे. तपास पथकानं पाठवण्यात आलेल्या ई मेल आयडीचा आयपी अॅड्रेस शोधण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती पोलीस दलाच्या वतीनं देण्यात आली आहे. द्वारका इथल्या दिल्ली पब्लिक स्कूलला धमकी देण्यात आली होती. पोलीस आणि बॉम्बशोधक दलाचे जवान बॉम्बचा शोध घेत आहेत, मात्र अद्यापही यामध्ये काही संशयास्पद आढळले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दिल्लीतील अनेक शाळांना मिळाल्या बॉम्बस्फोटाच्या धमक्या : दिल्लीतील आठ शाळांना बॉम्बस्फोटानं उडवण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक तपासात मंगळवारपासून अनेक धमक्या देण्यात आल्या आहेत. धमकीचा मेल पाठवणाऱ्या भामट्यानं मेलमध्ये तारखेचा उल्लेख केला नाही. मात्र यात बीसीसीचा उल्लेख आहे. त्यामुळे एकच मेल अनेकांना पाठवण्यात आल्याचं उघड झालं आहे. सध्या युद्धपातळीवर तपास सुरू असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे.

डीपीएस शाळेत बॉम्बची धमकी : या अगोदर गीता कॉलनीतील चाचा नेहरू चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती. बुधवारी सकाळी द्वारका इथल्या डीपीएस शाळेत बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानं शाळा प्रशासनात दहशत पसरली. त्यानंतर या धमकीबाबतची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस पथकासह अग्निशमन दल आणि बॉम्बशोधक पथकही घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून शाळेच्या प्रत्येक खोलीची झडती घेतली जात आहे. द्वारका सेक्टर 3 इथं डीपीएस पब्लिक स्कूलमध्ये बॉम्ब असल्याची धमकी शाळा प्रशासनाला ईमेलनं देण्यात आली. हा ईमेल मिळाल्यानं पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आल्यानं शाळेत दहशत पसरली.

शाळा प्रशासनानं विद्यार्थ्यांना पाठवलं घरी : धमकीचा ई मेल प्राप्त झाल्यानंतर शाळा प्रशासनानं तत्काळ विद्यार्थ्यांना घरी पाठवलं. त्यानंतर अग्निशमन विभागाला सकाळी 6 वाजता माहिती देण्यात आली. याबाबत द्वारका विभागाचे पोलीस उपायुक्त अंकित सिंह यांनी सांगितलं की, "सर्व वर्ग आणि संपूर्ण शाळेचा शोध सुरू आहे. पोलिसांनी संपूर्ण शाळा रिकामी केली असून प्रत्येक ठिकाणी तपास सुरू आहे."

हेही वाचा :

  1. बंगळुरू बॉम्बस्फोट प्रकरण : एनआयएकडून छत्रपती संभाजीनगरातील तीन तरुणांची चौकशी - Bengaluru Cafe Bomb Blast Case
  2. Pune ISIS Terror Module Case : पुणे इसीस मोड्युल प्रकरण ; साताऱ्यात दहशतवाद्यांकडून लूट, घेतलं बॉम्ब बनवण्याचं सामान
  3. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना धक्का, विशेष एनआयए न्यायालयानं बजावलं वॉरंट
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.