RTPCR Test Ado : आरटीपीसीआर चाचणीत पुरुषांचे बदलले लिंग.. लहान मुलांचे वय दाखविले 130 वर्ष..

By

Published : Jan 8, 2022, 9:46 PM IST

thumbnail

गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आरटीपीसीआर चाचणीत होत असलेला घोळ उघडकीस आला आहे. काही चाचण्यांमध्ये चक्क पुरुषांना स्री दाखवून थेट लिंगबदल करण्यात आले आहे. तर, लहान मुलांच्या चाचण्यांत चिमुरड्यांचे वय १३० वर्षे करण्यात आले आहे. कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीत ( Covid RTPCR Test ) ९ ते १० वर्ष वय असलेल्या १४ जणांची वय १३० वर्षे नोंदविले आहे. तर आठ पुरूषांची नोंद महिला म्हणून करण्यात आली ( Sex Changed In RTPCR Test ) आहे. तसेच आठ जणांचा क्रमांकही हा एकच दर्शविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गोंदिया येथील शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात ( Gondia Government Medical College ) घडला आहे. त्यामुळे कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराप्रती आरोग्य प्रशासन किती सजग आहे, हेच यावरून दिसून येत आहे. गोंदिया तालुक्यातील मोरवाही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून ( Morvahi Primary Health Centre ) गोंदिया येथील शासकिय महाविद्यालयात आरटीपीसीआर चाचणीसाठी ५० जणांचे नमुने ( RTPCR Test Sample ) पाठविण्यात आले होते. मात्र, त्यातील ९ ते १० वर्षाच्या मुलाचे वय १३० वर्षे नोंदविण्यात आले आहेत. उल्लेखनीय म्हणजे त्यातील आठ पुरुषांना महिलांच्या श्रेणीत टाकण्यात आले, असून त्या सर्वांचाच मोबाईल क्रमांक एकच टाकण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शासकीय यंत्रणांचा खेळखंडोबा यानिमित्ताने पुढे आला असून, कोरोनासारख्या भयावह संक्रमणात देखील आरोग्य विभागाचा असा गलथानपणा आरोग्य विभागाचे धिंडवडे काढणारा आहे. या सर्वच चाचण्यांचा अहवाल नकारात्मक आला ( Covid Test Negative ) आहे. यातील एकही चाचणीचा अहवाल सकारात्मक आला असता तर, आयसीएमआर पोर्टलवर ( ICMR Portal ) भरलेली माहिती बदलता येत नसल्याने उपचारासाठी अडथळा आला असता. याप्रकारची लापरवाही यापूर्वी देखील झाली असून, कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.