VIDEO : पुसद तालुक्यातील काळी गावात दोन गटात तणाव; घटनास्थळी पोलीस दाखल

By

Published : Dec 3, 2021, 8:26 PM IST

thumbnail

यवतमाळ - पुसद तालुक्यातील काळी गावात दोन गटात तणाव निर्मान झाला. या घटनेत तलवारीने २२ वर्षाच्या युवकाची हत्या झाल्याने तणाव चांगलाच वाढला आहे. काली गावात दंगल नियंत्रण पथक आणि पोलीस दाखल झाले आहे. गावातीलच एकाचा दुचाकीचा धक्का लागल्याने तलवारीने युवकावर हल्ला करण्यात आला. हल्यात २२ वर्षाचा युवकाचा जागीच मृत्यू झाला. श्याम शेषराव राठोड (२२) असे मृतक युवकाचे नाव आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील घटनास्थळी रवाना झाले आहे. यावेळी संपूर्ण बाजारपेठ बंद करण्यात आली असून गावात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.