Stray Cow Hit To Biker : दुचाकीस्वार दाम्पत्याला गाईनं धक्का देऊन पाडलं खाली, मग कळपानं तुडवलं; व्हिडिओ पाहुन येईल अंगावर काटा . . .

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 13, 2023, 12:39 PM IST

Updated : Oct 13, 2023, 12:52 PM IST

thumbnail

छत्रपती संभाजीनगर Stray Cow Hit To Biker : बिबी का मकबरा परिसरातील मोदी हिल कॉलनीत जोडप्याला गाईनं तुडवल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी समोर आली. प्रज्ञा घाडीगावकर या त्यांचे पती श्रीकांत आणि मुलगा पल्लव यांच्यासोबत दुचाकीवरुन जात असताना अचानक रस्त्यावरुन जाणाऱ्या गाईनं त्यांच्या दुचाकीला धक्का दिला. त्यामुळे तिघंही रस्त्याच्या बाजूला पडले. त्यावेळी इतर गाईंनी त्यांच्या जवळ जाऊन त्यांना तुडवलं. यामध्ये प्रज्ञा आणि श्रीकांत या जोडप्याला जबर दुखापत झाली. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मुलगा पल्लव यालाही किरकोळ दुखापत झाली. त्यापुढं दहा मिनिटांच्या अंतरावर याच गाईंनी एका आजी आजोबाला अशाच पद्धतीनं धक्का देऊन जखमी केलं आहे. त्यांच्यावर देखील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या गाईंचा त्रास गेल्या अनेक दिवसांपासून परिसरातील नागरिकांना होत आहे. 25 ते 30 गाईंचा हा कळप असून रस्त्यावर जाताना त्या कोणालाही धडक देतात. पंधरा दिवसापूर्वी एका व्यक्तीला त्यांनी अशाच पद्धतीनं तुडवलं असून तो देखील रुग्णालयात उपचारासाठी दाखल असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

Last Updated : Oct 13, 2023, 12:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.