Shivsena President :.., तर मराठी माणसाला न्याय मिळाला असता; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं विधान

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 8, 2023, 9:52 PM IST

thumbnail

रत्नागिरी : Ramdas Kadam on Raj Thackeray : राज ठाकरे यांच्यावर अन्याय झालाय, (Injustice with Raj Thackeray) असं शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Shinde group leader Ramdas Kadam) यांनी म्हटलंय. ते रविवारी मंडणगड येथे बोलत होते. रामदास कदम म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना ज्यावेळी शिवसेनेचा अध्यक्ष करण्यात आलं, त्यावेळी राज ठाकरे यांना अध्यक्ष केलं असतं तर मराठी माणसाला न्याय मिळाला असता. शिवसेनाप्रमुखांची दुसरी छबी म्हणून राज ठाकरे यांच्याकडं पाहिलं जातं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आधी राज ठाकरे यांनी राजकारणास सुरुवात केली. उद्धव ठाकरे हे खूप नंतर आले. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडं एक गोष्ट निश्चित चांगली आहे, की ते येणाऱ्या प्रत्येक माणसाला भेटतात. पण एक गोष्ट त्यांच्याकडे नाहीय, की ग्रामीण भागात जाऊन शेताच्या बांधावरसुद्धा ते उभे राहत नाहीत. त्यांना निश्चितच भवितव्य आहे, आम्ही दोघांनी सोबत काम केलंय, असं रामदास कदम (Ramdas Kadam) यावेळी म्हणाले.  

'त्या' सर्वांची उद्धव ठाकरे यांनी वाट लावली : दरम्यान, मी राज ठाकरेंच्या जवळ होतो म्हणून उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर डुक ठेवला आणि ज्या ज्या वेळी संधी मिळेल त्यावेळी माझ्यावर अन्याय केला, असा देखील आरोप यावेळी रामदास कदम यांनी केलाय. तसेच जे जे शिवसैनिक राज ठाकरे यांच्यासोबत होते, त्या सर्वांची उद्धव ठाकरे यांनी वाट लावली. कोणाची पदे काढून घेतली, कोणाला पदे दिली नाहीत. त्यांना खाली खेचण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं, असं देखील रामदास कदम म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.