Monsoon Session 2023: अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधक आक्रमक, महिला अत्याचाराविरोधात विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन

By

Published : Jul 19, 2023, 12:38 PM IST

Updated : Jul 19, 2023, 12:54 PM IST

thumbnail

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी महिला अत्याचाराविरोधात विरोधक सरकारविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपा नेते किरीट सोमैय्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी व हल्लाबोल आंदोलन केले. भाजपा नेते किरीट सोमैय्या यांच्याविषयी कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांमध्ये तीव्र संताप दिसून येत आहे. 'महिलांवर अत्याचार करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो', 'महिला झाल्या बेपत्ता सरकारला नाही पत्ता' अशी जोरदार घोषणाबाजी त्यांनी केली. मंगळवारी विधिमंडळाच्या सभागृहात या कथित व्हिडिओचे पडसाद उमटले होते. विरोधकांनी किरीट सोमैय्या यांच्या कथित व्हायरल व्हिडीओ प्रकरणी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. आजही विधिमंडळ अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दिसत आहे. 

Last Updated : Jul 19, 2023, 12:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.