Maratha quota protests : मराठा आरक्षण पेटलं! धाराशिवमध्ये उमरग्याला निघालेली बस पेटवली; पाहा व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 31, 2023, 12:40 PM IST

Updated : Oct 31, 2023, 2:31 PM IST

thumbnail

धाराशिव Maratha quota protests : मराठा आरक्षणाची धग आता सर्वत्र वाढू लागली आहे. ठिकठिकाणी आंदोलनं होत आहेत. धाराशिव जिल्ह्यातही रस्ता रोको, लोकप्रतिनिधींना आणि नेत्यांना गावबंदी अशी आंदोलनं होत असताना उमरगा येथे कर्नाटक राज्याची बस जाळण्यात आली. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी रात्रीपासून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, सोमवारी रात्री उमरगा तालुक्यातील तुरोरी येथे संतप्त आंदोलकांनी कर्नाटकची एसटी बस क्रमांक के.ए.३८ एफ. १२०१ ही बस पेटवून दिली. ही बस कर्नाटकातून उमरगा येथे येत होती. सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच उमरगा पोलीस निरीक्षक डी. बी. पालेकर, उमरगा आगार प्रमुख प्रसाद कुलकर्णी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. उमरगा नगर पालिकेच्या अग्निशमन गाडीनं आग विजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, अग्निशमन गाडी येण्यापूर्वी बसनं पूर्णतः पेट घेतला होता.

Last Updated : Oct 31, 2023, 2:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.