Congress Protest in Solapur : आमदार प्रणिती शिंदेंच्या मतदार संघात आठ महिन्यांपासून रस्ते दिवे बंद, काँग्रेस कार्यकर्त्यांचे मेणबत्त्या लावून आंदोलन

By

Published : Aug 21, 2023, 9:14 AM IST

Updated : Aug 21, 2023, 12:11 PM IST

thumbnail

सोलापूर : सोलापूर शहर मध्यच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंच्या मतदारसंघातील नागरी वस्ती गेल्या आठ महिन्यापासून अंधारात आहे. रस्त्यांवर दिवे नसल्याने नागरी वस्त्यांना खेड्याचं स्वरूप प्राप्त झालंय. रामवाडी, सलगर वस्ती, सेटलमेंट कॉलनी या भागात अनेक समस्या आहेत. महानगरपालिका प्रशासनाकडे अनेकवेळा तक्रारी करूनही समस्यांचं निराकरण केलं जात नाही, अशी नागरिक खंत व्यक्त करत आहे. रस्त्यांवर दिवे नसल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अंधारात मेणबत्या लावून निषेध केला. त्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केला.  नागरिक इंग्रजांच्या राजवटीत जीवन जगत आहोत की काय, असा सवाल काँग्रेस नेते देवा गायकवाड यांनी उपस्थित केला. इंग्रजांच्या राजवटीत देखील अशीच परिस्थिती होती. इंग्रज अधिकारी हे भारतीय लोकांची मुस्कटदाबी करत होते. तशी मुस्कटदाबी सोलापूर शहरातील नागरी वस्त्यांतील नागरिकांची प्रशासन करत आहे असा गंभीर आरोप त्यांनी स्मार्ट सिटीच्या महानगरपालिका प्रशासनावर केला. उल्लेखनीय म्हणजे, आमदार प्रणिती शिंदे यांचे वडील सुशीलकुमार शिंदे यांनी माजी केंद्रीय ऊर्जामंत्री म्हणून काँग्रेसची सत्ता असताना जबाबदारी पार पाडली आहे. 

Last Updated : Aug 21, 2023, 12:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.