'वर्ल्ड कप भारत की जान, साई रखेंगे हमारी शान' भाविकांसह शिर्डी ग्रामस्थांची साई चरणी प्रार्थना
शिर्डी World Cup २०२३ Final : विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघाच्या विजयासाठी देशभरात प्रार्थना होत आहेत. कुठं मंदिरात पूजेचं तर कुठे मशिदीत नमाजाचं आयोजन केलं जात आहे. भारत ऑस्ट्रेलिया या दोन क्रिकेट संघात आज सर्वात मोठ्या अहमदाबाद येथील स्टेडियमवर अंतिम वर्ल्ड कप सामना पार पडतोय. हा वर्ल्डकप भारतानं जिंकावा यासाठी शिर्डी ग्रामस्थांसह भाविकांनी साईबाबांच्या चरणी प्रार्थना केलीय. शिर्डी ग्रामस्थांसह भाविकांनी आज साईबाबांच्या द्वारकामाई समोरील प्रांगणात साईबाबांच्या मूर्तीची व बॅट, हेल्मेट, चेंडूची पूजा करत साईबाबांची 'शिर्डी माझे पंढरपूर' ही छोटी सामूहिक आरती केलीय. साईबाबांच्या चरणी भारताच्या विजयासाठी यावेळी सर्वांनी प्रार्थना केलीय. दरम्यान, यावेळी भाविकांसह ग्रामस्थांनी हातात तिरंगा ध्वज घेत 'वर्ल्ड कप भारत की जान, साई रखेंगे हमारी शान' या घोषणांनी द्वारकामाई परिसर काही काळ दुमदुमून गेला होता.