Ganeshotsav 2023 : शिवसेना भवनमध्ये साकारला इर्शाळवाडीचा देखावा; पाहा व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2023, 2:13 PM IST

Updated : Sep 23, 2023, 4:10 PM IST

thumbnail

पुणे : Ganeshotsav २०२३ : पुणे शहरात लाडक्या गणरायाचं आगमन झालंय. शहरातील विविध गणेश मंडळांनी विविध (Pune Ganpati Festival 2023) देखावे केले आहेत. जिवंत देखाव्यांची उज्ज्वल परंपरा पुण्याच्या गणेशोत्सवाला आहे. तसेच विविध सामाजिक विषय घेऊन (Ganpati Festival 2023) देखावे केले जात आहेत. पुण्यात शिवसेना भवन येथे (Shivsena Bhavan Pune) रायगडमधील इर्शाळवाडी येथील घडलेल्या घटनेचा देखावा (Irshalgad Landslide Incident) साकारलाय. या देखाव्यात इर्शाळवाडी पुनर्वसनचा संदेश देखील देण्यात आलाय. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून घडलेल्या घटनेत अनेकांचा जीव गेला होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही तासातच घटनास्थळी पोहोचले होते. या घटनेचा अनोखा देखावा पुण्यातील शिवसेना भवनमध्ये साकारला. हा देखावा बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.

Last Updated : Sep 23, 2023, 4:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.