Ganesh Visarjan २०२३ : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक गिरगाव चौपाटीकडं मार्गस्थ; भाविकांचा लोटला जनसागर

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2023, 10:42 AM IST

thumbnail

मुंबई : Ganesh Visarjan २०२३ : दहा दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवाची सांगता आज म्हणजेच अनंत चतुर्दशीला होत आहे. आज बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन होणार आहे. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' जयघोषासह भाविकांनी गणरायाच्या (Mumbaicha Raja Visarjan 2023) नामाचा जयघोष केला. मुंबईतील गणपती विसर्जनाला सुरुवात झाली आहे. गणेश गल्लीतील मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणरायाची विसर्जन (Ganpati immerssion 2023) मिरवणूक सकाळी साडेआठ वाजता (Ganesh Galli Ganpati) गिरगाव चौपाटीच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे. ढोल- ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत आपल्या लाडक्या बाप्पाला, मुंबईच्या राजाला निरोप देण्यासाठी मुंबईतील भाविकांनी गर्दी केली आहे. आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांनी मुंबईत गर्दी केली आहे.  

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.