आता माझं वय झालं, नाही तर मुलं आणलीच असती- अजित पवारांच मिश्किल वक्तव्य

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 25, 2023, 7:37 AM IST

thumbnail

बारामती DCM Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामतीच्या जिजाऊ भवनमध्ये तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या नुतन सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा रविवारी सत्कार झाला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.  या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, खराडेवाडीची एक महिला मला आज भेटली. तिनं पुण्यात शिक्षण संस्था सुरू केलीय. आता खराडेवाडीत काॅलेज सुरू करा, अशी तिची मागणी होती. आपण सुप्याला नुकतंच काॅलेज सुरू केलंय. खराडेवाडीसारख्या छोट्या गावात मुलं कुठून मिळणार,  असा मी तिला सवाल  केला. तर तुम्हीच बघा असं तिनं उत्तर दिलं. आता माझं वय झालं, नाही तर मुलं आणलीच असती, असं पवारांनी म्हणाल्यावर सभागृहात हास्यकल्लोळ माजला. राज्य सरकारनं मंत्री आदिती तटकरे यांच्या नेतृत्वात चौथं महिला धोरण आणलंय. त्या अंतर्गत आता वडिलांच्या नावापूर्वी आईचं नाव लागणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली. अर्थमंत्री या नात्यानं मी महिलांसाठी काही निर्णय घेतले आहेत. त्यानुसार सदनिका खरेदीवर महिलांसाठी एक टक्का सूट दिली आहे. पुरुषाच्या नावे हा व्यवहार होणार असल्यास ६ टक्के तर महिलांच्या नावे होणार असल्यास ५ टक्के कर द्यावा लागेल, अशी माहितीदेखील उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.