आमदार रवी राणांची क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी

By

Published : Sep 14, 2021, 7:14 PM IST

thumbnail

अमरावती - अमरावतीच्या बडनेरा मतदार संघाचे अपक्ष आमदार रवी राणा हे सातत्याने राज्य सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची फटकेबाजी करत असतात. मंगळवारी आमदार रवी राणा हे वेगळ्या अंदाजात दिसून आले. रवी राणा यांनी क्रिकेटच्या मैदानात जोरदार फटकेबाजी केली. अमरावती एका संस्थेकडून क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले होते. या क्रिकेट सामन्यांच्या समारोपासाठी आमदार रवी राणा यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते. यावेळी त्यांनाही क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही. राणा यांनी शब्दांऐवजी हातात बॅट घेऊन जोरदार फटकेबाजी केली . क्रिकेट मैदानावर केलेला आमदार रवी राणा यांचा व्हिडिओ सध्‍या व्हायरल होत आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.