ETV Bharat / sukhibhava

High Fiber Diet : हाय फायबरयुक्त अन्नाचे सेवन केल्यास स्मृतीभ्रंश होण्याचा धोका कमी

author img

By

Published : Feb 24, 2022, 5:00 PM IST

आहारतज्ज्ञ चांगल्या आरोग्यासाठी फायबरयुक्त घटक ( High Fiber Diet ) खाण्यास सुचवतात. हे फायबर निरोगी पचनसंस्थेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी फायदे देखील आहेत. फायबर निरोगी मेंदूसाठी देखील महत्त्वाचे असल्याचे पुरावे समोर आले आहेत. 'न्यूट्रिशनल न्यूरोसायन्स' जर्नलमध्ये यासंबंधित एक अभ्यास प्रकाशित झाला आहे.

HIGH FIBER
HIGH FIBER

आहारतज्ज्ञ चांगल्या आरोग्यासाठी फायबरयुक्त घटक खाण्यास सुचवतात. हे फायबर निरोगी पचनसंस्थेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी फायदे देखील आहेत. फायबर निरोगी मेंदूसाठी देखील महत्त्वाचे असल्याचे पुरावे समोर आले आहेत. 'न्यूट्रिशनल न्यूरोसायन्स' जर्नलमध्ये यासंबंधित एक अभ्यास प्रकाशित झाला आहे.

या संशोधनाचे नेतृत्व जपानमधील संशोधकांनी केले . उच्च फायबर आहारामुळे स्मृतिभ्रंश होण्याचा धोका कमी होतो. "स्मृतीभ्रंश हा एक विनाशकारी आजार आहे. यासाठी दीर्घकालीन काळजी घ्यावी लागते." असे प्रोफेसर काझुमासा यामागिशी यांनी सांगितले. "आम्हाला संशोधनात रस होता. आहारात फायबर प्रतिबंधात्मक भूमिका बजावतो. 1980 च्या दशकात सुरू झालेल्या मोठ्या अभ्यासासाठी आम्ही जपानमधील हजारो प्रौढांकडून गोळा केलेला डेटा वापरून याची तपासणी केली."

आहारातील सेवनाचे केले मूल्यांकन

या प्रयोगात 1985 ते 1999 या कालावधीतील आहारातील सेवनाचे मूल्यांकन केले गेले. यात सहभागी झालेले लोक 40 ते 64 वर्षे वयोगटातील होती. त्यानंतर 1999 ते 2020 पर्यंत त्यांचा पाठपुरावा करण्यात आला. आणि तेव्हा स्मृतीभ्रंश झाला की नाही याची चाचपणी केली. संशोधकांनी एकूण 3739 प्रौढ व्यक्तींकडील डेटा फायबरच्या प्रमाणानुसार चार गटांमध्ये विभागला. ज्या गटांनी जास्त प्रमाणात फायबर खाल्ले त्यांना स्मृतिभ्रंश होण्याचा धोका कमी होता.

फायबर डिमेंशियासाठी फायदेशीर

टीमने फायबरच्या दोन मुख्य प्रकारांमध्ये फरक तपासले. ओट्स आणि शेंगा यांसारख्या पदार्थांमध्ये आढळणारे तंतू हे आतड्यात राहणाऱ्या बॅक्टेरियासाठी तसेच इतर आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. संपूर्ण धान्य, भाज्या आणि इतर काही खाद्यपदार्थांमध्ये आढळणारे तंतू आतड्याच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असतात. फायबरचे सेवन आणि स्मृतिभ्रंश यांच्यातील विरघळणाऱ्या तंतूंसाठी हे महत्वाचे आहे. यात आतडे आणि मेंदू यांच्यात होणार्‍या संवादाचा प्रभाव असू शकतो. प्रोफेसर यामागिशी म्हणाले. यात फायबर आतड्यातील जीवाणूंच्या संरचनेचे नियमन करतात. ही रचना न्यूरोइंफ्लॅमेशनवर परिणाम करू शकते. हा घटक स्मृतिभ्रंशाच्या प्रारंभामध्ये महत्वाची भूमिका बजावतो. आहारातील फायबर स्मृतिभ्रंशासाठी हे शरीराचे वजन, रक्त दाब, लिपिड्स आणि ग्लुकोजची पातळी इतर घटक कारणीभूत ठरतात. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया, बरेच लोक पोषणतज्ञांच्या शिफारसीपेक्षा कमी फायबर वापरतात. उच्च आहारातील फायबरम स्मृतिभ्रंशाच्या घटना कमी करणे शक्य होऊ शकते.

हेही वाचा - Over diet is harmful for health : अतिडाएट आरोग्याला हानिकारक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.