ETV Bharat / state

नवरात्रोत्सव : अनेक मंडळाचा मूर्तीऐवजी घटस्थापना करण्याचा निर्णय, मूर्तीकार अडचणीत

author img

By

Published : Sep 23, 2020, 4:55 PM IST

नवरात्री उत्सवाला कोरोनाचा फटका
नवरात्री उत्सवाला कोरोनाचा फटका

यंदा कोरोनाच्या संकटामुळे यवतमाळमधील लोकमान्य दुर्गा उत्सव मंडळाने यंदा भव्यदिव्य मूर्ती स्थापन करण्याचे टाळत फक्त घट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, अनेक मंडळांनी कोरोनापासून जनतेचा बचाव व्हावा म्हणून साध्या पद्धतीने दुर्गा उत्सव साजरा करावा, असे आवाहन देखील त्यांनी इतर मंडळांना केले आहे.

यवतमाळ : जिल्ह्यात सर्वत्र नवरात्री उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. यंदा मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाने देवीच्या भव्य मूर्तीऐवजी घट स्थापन करून साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवरात्री उत्सवाला कोरोनाचा फटका

जिल्ह्यात साधारण 2 हजार 300 सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ भव्य मूर्ती स्थापन करतात. देखावे तयार करतात. तर, शहरात 265 सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ आहेत. त्यातील सर्वात लोकप्रिय मंडळ म्हणून लोकमान्य दुर्गा उत्सव मंडळ हे ओळखले जाते. यंदा मात्र कोरोनाच्या संकटामुळे या दुर्गा उत्सव मंडळाने फक्त घट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. भव्यदिव्य मूर्ती स्थापन करण्याचे त्यांनी टाळले आहे. तसेच, अनेक मंडळांनी कोरोनापासून जनतेचा बचाव व्हावा म्हणून साध्या पद्धतीने दुर्गा उत्सव साजरा करण्याचे आवाहन देखील इतर मंडळांना केले आहे.

नवरात्री उत्सवाबाबतच्या सरकारच्या मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीत. गणेशोत्सवामध्ये मार्गदर्शक सूचना होत्या. तशा प्रकारच्या सूचना दुर्गा उत्सवाबाबत अजूनही प्रशासनाला प्राप्त झाल्या नाही. त्यामुळे देवीच्या मूर्ती तयार करणारे विचारात पडले आहेत. पूर्वी मूर्तीकारांना 20 ते 25 तर काहींना 40 मोठ्या देवीच्या मूर्तींची ऑर्डर मिळायची. आता मात्र हेच काम 5 ते 7 मूर्तींवर आले आहे. त्यातही काही सार्वजनिक मंडळांनी केवळ 3 फूट मूर्ती बनवा असे सांगितले आहे. तसे सांगणाऱ्या मंडळाची संख्या फारच कमी आहेत. त्यातही मूर्तीकलेवर उदरनिर्वाह करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत आता वाढ झाली असल्याचे, मूर्तीकार सांगतात. त्यात कोरोनामुळे मूर्तीसाठी लागणाऱ्या वस्तूच्या किमती वाढल्या आहेत. अशातच मूर्तीकारांंना आता कमी ऑर्डर आलेल्या आहेत.

हेही वाचा - घराला सौंदर्य देणारे नर्सरी चालक संकटात; ग्राहक नसल्याने उलाढाल ठप्प

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.