ETV Bharat / state

ETV Bharat Special News : शाळकरी मुलाचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय; भाजी विक्रीतून देतोय व्यसनमुक्तीचा संदेश

author img

By

Published : Jan 7, 2022, 6:15 PM IST

ETV Bharat Special News
शाळकरी मुलाचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय

वय वर्ष तेरा. घरची आर्थिक परिस्थिती नाजुक, मोठ होऊन डाॅक्टर व्हायचे स्वप्न बघणारा लोनबेहळचा अंकुश राजु आडे हा विद्यार्थी. आई-वडिलांना हातभार लागावा म्हणून शाळेतून घरी आल्यानंतर डोक्यावर भाजीपाल्याच्या डाले घेऊन गावभर वेगळ्या स्टाईलने भाजीपाला विकत असल्याने ( school boy sells vegetables In Yavatmal ) त्याची संपुर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. याबाबत ईटीव्ही भारतने घेतला हा आढावा...

यवतमाळ - वय वर्ष तेरा. घरची आर्थिक परिस्थिती नाजुक, मोठ होऊन डाॅक्टर व्हायचे स्वप्न बघणारा लोनबेहळचा अंकुश राजु आडे हा विद्यार्थी. आई-वडिलांना हातभार लागावा म्हणून शाळेतून घरी आल्यानंतर डोक्यावर भाजीपाल्याच्या डाले घेऊन गावभर वेगळ्या स्टाईलने भाजीपाला विकत ( school boy sells vegetables In Yavatmal ) असल्याने त्याची संपुर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.

भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या मुलासह इतरांच्या प्रतिक्रिया

आई-वडिलांच्या खांद्याला खांदा शाळेसोबत व्यवसाय -

मुलांवर बाराखडीचे योग्य संस्कार बिंबिवता बिंबिवता भूमिपुत्र्यांच्या मुलांच्या मेंदूवर व्यवसायिकतेचे गोंधन करून शेतकरी मायबापाला हातभार लावण्याचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत दिलेल्या जाते. यातूनच अंकुश आडे नावाचा विद्यार्थी योग्य बोध घेत आई-वडिलांच्या खांद्याला खांदा लावून शिक्षणासोबतच भाजीपाला व्यवसायिकतेचे शिक्षण घेत आहे. गावापासून बारा किमी अंतरावर असलेल्या आर्णीवरून ऑटोने प्रवास करून भाजी मंडीतून पहाटे भाजीपालाचा मांडीतून खरेदी करून घरी आणतो. शिक्षकांनी दिलेला अभ्यासक्रम पुर्ण करून तो भाजी विक्री करण्यासाठी निघतो.

चिमुरडा करतो सतत थडपड -

शाळेत शिक्षकांनी शिकवलेल्या अभ्यासाला प्रामाणिकपणे आत्मसात करून सायंकाळी शाळेची लांब गजर होताच अंकुश तडक घराची वाट धरतो. त्यानंतर पाटीवर असलेलं दप्तराचे ओझं खुंटीला टांगून ठेवतो. भाजीपाल्याची वर्गवरी करून भाजीपाल्याचा डाले डोक्यावर ठेऊन अवघे गाव कवेत घेत, "ओ आजी घेता का भाजी, भाजी ताजी खाव आजी, हो ताजी" अशी कर्णमधुर आरोळी देत अवघ्या गावात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. यातून स्वतःच्या शैक्षणिक खर्च भागवून मायबापालाही सुखाचे दोन घास मिळावेत यासाठी चिमुरडा सतत धावपळ करीत आहे.

विद्यार्थी जिल्ह्यात कौतुकाचा विषय -

परिश्रमाशिवाय शिक्षण शक्य नाही, हा विचार अंकुशने मनोमन केला. तिथूनच त्याच्या मेंदूवर भाजीपाला व्यवसायाचे विक्रीचे धडे अपसुकच कोरल्या गेले. दिवसभरातून शिक्षणाचे धडे गिरवता गिरवता आई-वडिलांचाही भाकरीचा प्रश्न सोडवत असल्याने सदर विद्यार्थी जिल्ह्यात कौतुकाचा विषय बनला आहे.

महिलांच्या तो फॅन -

कर्णमधुर शब्दांकांनी संपुर्ण गावातील महिला, मुली अंकुशच्या भाजी विक्रीच्या आरोळीने गावातील अबालवृद्ध आणि महिलांच्या तो फॅन बनलाय. त्यामुळे घराघरातील महिला अंकुशचा आवाज ऐकुन ग्राहकांचे कान अंकुशची आरोळी ऐकण्यासाठी असुसलेले असतात. गावातील महिला चिमुरड्यांचे परिश्रम बघून त्याला ही भाजीपाला घेऊन चार दोन पैशाचा आधार देऊन त्याच्या आणि उदरनिर्वाहासाठी हातभार लावतात. भाजी विक्रीची अफलतून लकब यावर अवघ्या गावातील महिला त्यांच्याजवळील भाजीची घेण्यासाठी दरादारात उभ्या असतात.

हेही वाचा - Mumbai Police Corona : मुंबईत ओमायक्रॉनचा कहर! 24 तासांत तब्बल 'इतक्या' पोलिसांना झाली कोरोनाची लागण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.