ETV Bharat / state

Protest for Chandrababu Naidu : चंद्राबाबू नायडूंच्या अटकेचे महाराष्ट्रात पडसाद; यवतमाळमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2023, 5:23 PM IST

Updated : Sep 18, 2023, 7:42 PM IST

Protest for Chandrababu Naidu
Protest for Chandrababu Naidu

Protest for Chandrababu Naidu : सीआयडीनं ३५० कोटींच्या कौशल विकास घोटाळ्याप्रकरणी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्रबाबू नायडू यांना अटक केलीय. त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ तेलंगाणात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. त्यांच्या अटकेचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात चंद्रबाबूंच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलंय.

चंद्राबाबू नायडूंच्या अटकेचे महाराष्ट्रात पडसाद

यवतमाळ Protest for Chandrababu Naidu : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्रबाबू नायडू यांच्या अटकेच्या निषेधार्थ यवतमाळच्या मारेगावात मोर्चा काढण्यात आलाय. मारेगाव, झरी जामणी व वनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात आंध्र प्रदेशचे शेतकरी शेती करण्यासाठी वास्तव्याला आहेत. या शेतकऱ्यांनी चंद्राबाबू नायडूंच्या अटकेच्या निषेधार्थ सभा घेऊन मारेगाव तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. चंद्राबाबू नायडूंना खोट्या आरोपाखाली व चुकीच्या पद्धतीनं अटक केल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केलाय.

500 हून अधिक शेतकऱ्यांचे आंदोलन : चंद्रबाबू नायडू यांना पाठिंबा देण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील ५०० हून अधिक शेतकऱ्यांनी मारेगावात आज आंदोलन केलय. यावेळी आंदोलकांनी तहसील कार्यालयावर मोर्चाही काढलाय. चंद्रबाबू नायडू हे सध्या आंध्र प्रदेशातील राजमुंद्री मध्यवर्ती कारागृहात बंद आहेत. अटकेच्या वेळी त्यांच्या समर्थकांनी जोरदार प्रदर्शन करत अटकेला विरोध केला होता. आता त्यांची सुटका होईपर्यंत विविध ठिकाणी उपोषणं व आंदोलनं सुरू राहणार असल्याचं त्यांच्या समर्थकांनी सांगितलंय. चंद्रबाबू नायडू यांच्या समर्थकांनी तेलंगाणामधील विविध शहरांमध्ये आंदोलन केलं. नायडू यांना केलेल्या अटकेचा तीव्र निषेध टीडीपी कार्यकर्त्यांनी यावेळी केला. हैदराबादमधील वनस्थलीपुरम येथं निदर्शनं करण्यात आली. यामध्ये बीआरएस आमदार सुधीर रेड्डी यांच्यासह सुमारे २५० कार्यकर्ते सहभागी झाले होते.

३५० कोटींच्या कौशल विकास घोटाळ्याप्रकरणी अटक : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगु देसम पार्टीचे प्रमुख चंद्रबाबू नायडू यांना ९ सप्टेंबरला आंध्र प्रदेश सीआयडीनं अटक केली होती. ३५० कोटींच्या कौशल विकास घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. चंद्रबाबू नायडू यांच्या अटकेनंतर त्यांचे समर्थक ठिकठिकाणी आंदोलनं करून याचा निषेध करत आहेत. महाराष्ट्रातही याचे पडसाद उमटले असून, यवतमाळ जिल्ह्यात चंद्रबाबूंच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलंय.

जगन यांनी आंध्रप्रदेशचा सत्यानाश केला- राजलक्ष्मी म्हणाल्या, चंद्राबाबू गरिबांसाठी आंदोलन करतात. कुंटूब व घर सोडून लोकांसाठी चंद्राबाबू संघर्ष करतात. मात्र, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन यांनी त्यांना कोणताही घोटाळा नसताना अटक केली आहे. चंद्राबाबुंमुळेच आंध्रप्रदेशला ओळख मिळाली आहे. आंदोलक लक्ष्मीनारायण जावा म्हणाले, प्रत्येक राज्यात एक राजधानी आहे. मात्र, आंध्रप्रदेशमध्ये एकही राजधानी नाही. जगन यांनी आंध्रप्रदेशचा सत्यानाश केला आहे.

हेही वाचा :

  1. Chandrababu Naidu Arrested : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना अटक
  2. Chandrababu Naidu : चंद्रबाबू नायडू यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातले शेतकरी; पुकारलं आंदोलन
  3. Chandrababu Naidu : अन् चंद्राबाबू चढले चक्क बसवर! जगन मोहन रेड्डी यांच्यावर केली सडकून टीका
Last Updated :Sep 18, 2023, 7:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.