ETV Bharat / bharat

Chandrababu Naidu : अन् चंद्राबाबू चढले चक्क बसवर! जगन मोहन रेड्डी यांच्यावर केली सडकून टीका

author img

By

Published : Jan 6, 2023, 8:01 PM IST

चंद्रबाबूंच्या (Chandrababu Naidu) कुप्पम मतदारसंघातील गुडीपल्ली भेटीमुळे पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला. (Chandrababu Naidu in Kuppam Andhra Pradesh). चंद्राबाबू यांनी गुडीपल्ली येथील पक्ष कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखले. संतापलेले चंद्रबाबू थोडावेळ रस्त्यावर बसले. त्यानंतर पोलिसांनी त्याला जाऊ दिले नाही म्हणून चंद्राबाबू आपल्या बसवर चढले आणि भाषण केले. (Chandrababu Naidu climbs on bus).

Chandrababu Naidu climbs on bus
चंद्राबाबू नायडू बसवर चढले

गुडीपल्ली (आंध्र प्रदेश) : तेलुगू देसम पार्टीचे प्रमुख चंद्रबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांच्या चित्तूर जिल्ह्यातील कुप्पम मतदारसंघाच्या दौऱ्यासाठी पोलिस प्रत्येक टप्प्यावर अडथळे निर्माण करत आहेत. आता पोलिसांनी त्यांना गुढीपल्ली येथील त्यांच्या पक्ष कार्यालयात जाण्यापासून रोखले. चंद्रबाबूंनी स्थानिक बसस्थानकाजवळील रस्त्यावर पोलिसांच्या या वृत्तीचा निषेध केला आहे. यावेळी बोलताना चंद्रबाबूंनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी आणि राज्य पोलिसांच्या वागणुकीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. या भागातील लोकांच्या मनात राग होता की पोलिस कशाप्रकारे त्यांना गुढीपल्लीत येण्यापासून रोखू शकतात. यानंतर चंद्रबाबू बसच्या टपावर चढले आणि लोकांशी संवाद साधला. (Chandrababu Naidu climbs on bus). (Chandrababu Naidu in Kuppam Andhra Pradesh).

पोलिसांनी गुलाम म्हणून जगू नये : यावेळी बोलताना चंद्रबाबू नायडू म्हणाले, 'या पोलिसांनी गुलाम म्हणून जगू नये. गुलामी म्हणजे काय? तुम्ही गुलाम म्हणून जगू नका. कायद्यानुसार आपले कर्तव्य पार पाडा. ते मला इथून परत पाठवायचा प्रयत्न करत आहेत. पण मी जाणार नाही. मी तुम्हाला येथून पाठवीन. केवळ तुम्हीच नाही तर ते सायको मुख्यमंत्री देखील. जोपर्यंत त्यांचा पक्ष कायमचा जमीनदोस्त होत नाही तोपर्यंत मी तेलुगू लोकांसाठी लढेल. माझा आवाज ५ कोटी लोकांचा आवाज आहे. जगन मोहन यांनी हे लक्षात ठेवावे. अशा अराजकतेला लोकशाहीत काही एक स्थान नाही'.

माझ्यासाठी वेगळा कायदा आहे का? : पुढे बोलताना चंद्रबाबू म्हणाले, 'मी विचारले तर पोलीस अधिकारी पळून जातात का? संबंधित अधिकाऱ्यांना लाज वाटते का? हे कायद्याची अंमलबजावणी न करता मनमानीपणे वागतात. लोकांनी यांच्याकडे पाठ फिरवली तर काय करणार? पोलीस कुठे आहेत? त्यांना शोधण्यासाठी तुम्हाला फिरावे लागेल. किती तुरुंग आणि पोलीस ठाणे आहेत? त्यात किती लोकं मावू शकतात? जीओ क्रमांक १ बेकायदेशीर आहे. मुख्यमंत्री जगन मोहन यांनी राजमहेंद्रवरममध्ये सभा घेतली नाही का? रोड शो करू शकत नाही? तुमच्या पक्षाचे नेते रोड शो करत नाहीत का? जगन, याचे उत्तर द्या. तुमच्यासाठी एक कायदा आणि माझ्यासाठी वेगळा कायदा. पोलिसांनी सर्व पक्षांना समान वागणूक दिल्यास लोक त्यांना सहकार्य करतील. जो कोणी कायद्याचे उल्लंघन करतो तो दोषी आहे'.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.