ETV Bharat / state

वणी विधानसभा मतदारसंघ : मनसे बिघडविणार प्रस्थापितांचे गणित

author img

By

Published : Oct 13, 2019, 2:20 AM IST

मनसेने विदर्भामधील वणी मतदारसंघात एकमेव उमेदवारी दिली आहे. येथील नगरपालिकेवर मनसेचे वर्चस्व आहे. त्यामुळे प्रस्थापितांचे गणित बिघडवण्यास मनसेचा मोठा वाटा राहणार आहे.

मनसे प्रचार

यवतमाळ - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विदर्भातील वणी येथे मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर हे रिंगणात आहे. जिल्ह्यातून या मतदारसंघात सर्वाधिक 20 उमेदवार रिंगणात आहेत. तसेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षाचे बंडखोर उमेदवार असल्याने या मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाय मनसे निवडणूक लढविणार असल्याने काँग्रेस, भाजप यांच्या विजयाचे गणित बिघडणार असल्याचे अंदाज वर्तवल्या जात आहे.

मनसे बिघडविणार प्रस्थापितांचे गणित

यवतमाळ जिल्ह्याच्या वणी विधानसभा मतदारसंघात आघाडी व युतीच्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे सर्वाधिक चुरस या मतदारसंघात आहे. काँग्रेसचे वामनराव कासावर, शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर आणि सुनील कातकडे आणि काँग्रेसचे संजय देरकर हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर मनसेकडून राजू उंबरकर हेही विरोधकांना आव्हान देत आहेत. मतदारसंघात मनसेची ग्रामीण भागात मोठी पकड आहे. शिवाय महाराष्ट्रातील वणी नगरपालिकेवर मनसेचा कब्जा आहे. मनसेचे संस्थापक राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून राजू उंबरकर यांचीओळख आहे. संघटनकौशल्य, युवकांची फळी आणि स्थानिक प्रश्नावर पाच वर्षात केलेली आंदोलने यामुळे वनी मतदारसंघांमध्ये मनसे ही निर्णायक भूमिका बजावणार आहे.

Intro:Body:यवतमाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विदर्भातील वणी येथे मनसेचे राज्यउपाध्य राजू उंबरकर यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. या मतदार संघात
सर्वाधिक 20 उमेदवार रिगणात उभे आहे. तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षाचे बंडखोर उमेदवार असल्याने या मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनसे निवडणूक लढविणार असल्याने काँग्रेस, भाजप यांचे विजयाचे गणित बिगडविणार आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या वणी विधानसभा खऱ्या अर्थाने निवडणूकीचा आखाडा झाला आहे .
येथे आघाडी युतीचे उमेदवार यांनी बंडखोरी केली आहे.
त्यामुळे सर्वाधिक चुरस या मतदारसंघात आहे. काँग्रेसचे वामनराव कासावर, शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर आणि सुनील कातकडे काँग्रेसचे संजय देरकर यांनी अर्ज भरला आहे.
त्यामुळे येथ चुरस निर्माण झाली आहे. मनसे कडून राज्यउपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी अर्ज भरला असून मोठया प्रमाणात शक्ती प्रदर्शन करीत आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मनसेची ग्रामीण भागात मोठी पकड असून तिच मोठी ताकत आहे. आजपर्यंत कुठल्याही पक्षाच्या आमदाराने स्थानिक प्रश्न सोडवले नसल्याने मतदार संघाचा विकास झाला नाही. या उलट मनसेने स्थानिक प्रश्नावर विविध आंदोलन कले आहे. या सर्व गटतट, पक्षीय राजकारण, सर्वेसमाज याना घेऊन चालणारा उमेदवार म्हणून मनसे कडे पाहल्या जात आहे. महाराष्ट्रातील एकमेव वनी नगरपालिकेवर मनसेने सत्ता स्थापन केली होती. त्यावेळेस पासून संपूर्ण राज्याचे लक्ष या भागात लागले होते. मनसेचे संस्थापक राज साहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून राजू उंबरकर यांची एक ओळख आहे. तर विदर्भातील मतदारसंघात उमेदवारी देण्यात आल्या यामध्येही राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांचा महत्त्वाचा वाटा आहे. मतदारसंघांमध्ये असलेलं संघटनकौशल्य, युवकांची फळी आणि स्थानिक प्रश्नावर केलेले पाच वर्षात शेकडो आंदोलने यामुळे वनी मतदारसंघांमध्ये मनसे ही निर्णायक भूमिका बजावणार आहे.

बाइट- राजू उंबरकर,मनसेचे राज्यउपाध्यक्षConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.