ETV Bharat / state

गावकऱ्यांचं अर्थकारण बदलून टाकणारा बाप्पा...

author img

By

Published : Sep 1, 2019, 9:06 AM IST

Updated : Sep 3, 2019, 3:27 PM IST

बाप्पांचे आगमन उद्यावर येऊन ठेपला आहे. वाशिममधील सावरगाव बरडे या लहानशा गावातील गणेशमूर्तींचे विशेष आकर्षण आहे. गेल्या ४० वर्षांपासून येथे कोरीव आणि रेखीव गणेश मूर्ती तयार होतात. यासाठी हे गाव प्रसिद्ध आहे.

गावकऱ्यांचं अर्थकारण बदलून टाकणारा बाप्पा...

वाशिम - गणपती बाप्पांचे उद्या आगमन होणार आहे. जिल्ह्यातील गणेश भक्तांची लगबग सुरू झाली आहे. गत ४० वर्षांपासून जिल्ह्यातील सावरगाव बरडे या लहानशा गावातील गणेशमूर्तींचे विशेष आकर्षण आहे. येथे तयार होणाऱ्या गणेश मूर्तीच्या कोरीव आणि रेखीव रंगकामांमुळे हे गाव प्रसिध्द झाले आहे. येथील काही गावकऱ्यांचे आणि कलाकारांचे अर्थकारणही यावर अवलंबून असल्याने रोजगाराबाबतीत लोक समाधानी आहेत.

'देव साकारणार गाव '

हेही वाचा - क्षणभरात प्रेमात पडणारे सौंदर्यमय कोकण; पाहा नयनरम्य फुलांचा देखावा

गावातील कलावंतांचे अर्थकारण बदलवून टाकणारा हा व्यवसाय उद्योगाच रुप घेऊ शकला नसला तरी सावरगाव बरडे या गावाची ओळख 'देव साकारणारा गाव' अशी निर्माण झाली आहे. मूर्तीची सुबकता, आकर्षक रंगसंगती आणि वाजवी किंमत या बाबीमुळे गणेशमूर्तीसाठी सावरगावचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. येथे अकोला, बुलडाणा, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यातून गणेश मूर्तीची नोंदणी केली जाते. साधारण ग्रामीण भागात शहरातून मूर्ती नेली जात असल्याचे पहावयास मिळते. परंतु, सावरगाव बरडे या लहानशा गावातून लगतच्या चार ते पाच जिल्ह्यात गणेशमूर्ती नेल्या जात असल्यामुळे याठिकाणी गर्दी होते.

हेही वाचा - गणेशमूर्तींवर फिरतोय अखेरचा हात; रेखणीच्या कामांना वेग

गावात गणेश मूर्ती बनविण्याचे काम वर्षभर सुरु असते. सार्वजनिक गणेश मंडळासोबतच घरगुती मूर्तीची मागणी केली जाते. यंदा ६ इंचापासून १० ते १२ फुटापर्यंत उंचीच्या मूर्तींना प्रचंड मागणी असून गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपल्यामुळे मूर्तींवर आता शेवटचा हात फिरवण्याची लगबग सुरू आहे. सावरगाव मधील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह गणेशमूर्ती विक्रीवर अवलंबून असून दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल या व्यवसायातून होत असते.

हेही वाचा - गेल्या पाच पिढ्यांपासून 'हे' कुटुंब साकारतंय पर्यावरणपूरक देखण्या गणेशमूर्ती

Intro:स्लग :- 'देव साकारणार गाव '

रिपोर्टर : इमरान खान, वाशिम

एंकर : बातमी वाशिम ची महाराष्ट्राचं लाडकं दैवत म्हणजे गणपती बाप्पा गणपतींचं आगमन दोन दिवसावर येऊन ठेपले आहे. जिल्ह्यातील गणेश भक्तांची लगबग सुरू झाली. गत चाळीस वर्षांपासून गणेश मुर्तीच्या कोरीव आणि रेखीव रंगकामांमुळे वाशीममधील सावरगाव बरडे हे लहानशे गाव 'देव साकारनार गाव' म्हणून प्रसिध्दी झोतात आले.


विओ 1 :- गावातील कलावंतांच अर्थकारण बदलवून टाकणारा हा व्यवसाय उद्योगाच रुप घेवू शकला नसला तरी सावरगाव बरडे या गावाची ओळख 'देव साकारणार गाव ' अशी निर्माण झाली मुर्तीतील सुबकता, आकर्षक रंगसंगती आणि वाजवी किंमत या बाबीमुळे गणेशमुर्तीसाठी सावरगावच नाव अग्रक्रमाने घेतल्या जाते.

बाईट :- मुर्तीकार 
बाईट :- मुर्तीकार महिला


विओ 2 :- अकोला, बुलडाणा, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यातून गणेश मुर्तीची नोंदणी केल्या जाते.साधारण ग्रामीण भागात शहरातून मुर्ती नेल्या जात असल्याचे पहावयास मिळते परंतू सावरगाव बरडे या लहानशा गावातून लगतच्या चार ते पाच जिल्ह्यात गणेशमुर्ती नेल्या जात असल्यामुळे याठिकाणी एकच गर्दी होते.


बाईट :- मुर्तीकार 


विओ 3 :- या गावात गणेश मुर्ती बनविण्याचे काम वर्षभर सुरु असते,सार्वजनिक गणेश मंडळासोबतच घरगुती मुर्तीची मागणी केल्या जात असल्यामुळे येथे मागणी नोंदविल्या जाते.यंदा सहा इंचापासून दहा ते बारा फुटांपयर्ंत उंचीच्या मूर्तींना प्रचंड मागणी असून गणेशोत्सव तोंडावर येऊन ठेपल्यामुळे मूर्तींवर आता शेवटचा हात फिरवण्याची लगबग सुरू आहे. सावरगाव मधील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह गणेशमूर्ती विक्रीवर अवलंबून असून दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल या व्यवसायातून होत असते.Body:'देव साकारणार गाव 'Conclusion:'देव साकारणार गाव '
Last Updated :Sep 3, 2019, 3:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.